TMC : महापालिका आयुक्तांकडून कोपरी परिसराची पाहणी, अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे दिले निर्देश

| Updated on: Jul 01, 2022 | 2:05 AM

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बारा बंगला परिसर, शांती नगर कोपरी, ठाणेकर वाडी, कोपरीगाव, कै. कृष्णा बोरकर मार्ग, कोपरी स्मशानभूमी, ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्प, अष्टविनायक चौक, मीठबंदर रोड, मंगला हायस्कूल तसेच सिडको बस स्टॉप या ठिकाणांची पाहणी केली.

TMC : महापालिका आयुक्तांकडून कोपरी परिसराची पाहणी, अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे दिले निर्देश
ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्ण
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

ठाणे : ठाण्यात पाऊस पडण्यास जोरदार सुरुवात झाली असून आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता, साफसफाई कामाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr.Vipin Sharma) यांचे पाहणी दौराही सुरू आहेत. कोपरी (Kopari) परिसरातील रस्ते, फुटपाथ, ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्प तसेच इतर ठिकाणांची महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी (Inspection) केली. या पाहणीत सर्व अत्यावश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच सॅटिस प्रकल्पाचे काम अधिक गतीने करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिले. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त शंकर पाटोळे, उप आयुक्त अनघा कदम, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, उप नगर अभियंता गुणवंत झांबरे तसेच सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, उप अभियंता व इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बारा बंगला परिसर, शांती नगर कोपरी, ठाणेकर वाडी, कोपरीगाव, कै. कृष्णा बोरकर मार्ग, कोपरी स्मशानभूमी, ठाणे पूर्व सॅटिस प्रकल्प, अष्टविनायक चौक, मीठबंदर रोड, मंगला हायस्कूल तसेच सिडको बस स्टॉप या ठिकाणांची पाहणी केली.

आयुक्तांनी शहरातील सुविधांचा सविस्तर आढावा घेतला

ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत सुरु असलेल्या सुशोभीकरणाच्या सर्व कामांचीही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यामध्ये अष्टविनायक चौक ते गणेश विसर्जन घाट (मीठबंदर रोड ) रस्ता व पदपथाचे नूतनीकरण, उद्यान, वाहनतळ, मनोरंजनात्मक सुविधा, विद्युत रोषणाई, जेट्टी रस्त्याचे नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांचे जतन करण्याकरीता चौथऱ्याचे बांधकाम, दशक्रिया विधीकरिता चौथरा आदी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला आणि सूचना केल्या. कोपरी परिसरातील या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देत पावसाळ्यात रस्त्यांची नियमित साफसफाई, रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी, फुटपाथ साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. (Thane Municipal Commissioner Dr Vipin Sharma inspected the Kopari area)

हे सुद्धा वाचा