AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sahar Shaikh : ‘कैसा हराया’ बोलून रातोरात प्रसिद्ध झालेली मुंब्र्याची नगरसेविका सहर शेखवर मोठा आरोप, तिने समोर येऊन दिलं स्पष्टीकरण

Sahar Shaikh : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंब्र्याची एक नगरसेविका रातोरात चर्चेत आलेली. तिचा 'कैसे हराया…' हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. आता तिच्यावर एक गंभीर आरोप झाला आहे. तिने या बद्दल समोर येऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

Sahar Shaikh : 'कैसा हराया' बोलून रातोरात प्रसिद्ध झालेली मुंब्र्याची नगरसेविका सहर शेखवर मोठा आरोप, तिने समोर येऊन दिलं स्पष्टीकरण
sahar younus shaikh
| Updated on: Apr 21, 2026 | 11:55 AM
Share

‘कैसे हराया…’, ‘सगळा मुंब्रा हिरवा करणार’ अशा वक्तव्यांमुळे रातोरात चर्चेत आलेली AIMIM ची युवा नेता सहर शेख आता एका नव्या वादात सापडली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या वॉर्ड नंबर 30 मधून सहर शेखने नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली होती. आता सहर शेखवर निवडणुकी दरम्यान खोटी कागदपत्र दाखवल्याचा आरोप झाला आहे. हा वाद वाढत असल्याचं पाहून सहर शेखने आपलं मौन सोडलं आहे. “माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप आधारहीन असून राजकीय दृष्टया मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे” असं सहर शेखने म्हटलं आहे.

“मागच्या पाच-सहा दिवसांपासून ज्या बातम्या चालवल्या जात आहेत, त्याचा मला खूप त्रास होतोय. मला फरार म्हटलं गेलं, नॉट रिचेबल आहे असं सांगतायत. प्रत्यक्षात मी जमिनीवर काम करत होती. जेव्हा तुम्ही लोकांमध्ये राहून काम करताय आणि त्याचवेळी तुमच्याबद्दल चुकीचं पसरवलं जातं, त्याचा खूप त्रास होतो. सुरुवातीला मी मीडियापासून मुद्दाम लांब राहिली. कारण मला कायदेशीर प्रक्रिया समजून घेऊन त्यानुसारच उत्तर द्यायचं होतं” असं सहर शेखने सांगितलं.

कोर्टात उत्तर द्यावं लागेल

“मी या सगळ्या प्रकरणात कायदेशीर लढाई लढणार आहे. आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून आम्ही कायदेशीर प्रक्रियेला वेळ दिला. आता यापुढे मी प्रत्येक आरोपाला कोर्टात उत्तर देईन. ज्यांनी हे आरोप केलेत, त्यांना कायदेशीर आव्हान देणार. माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक चुकीचे फोटो आणि बॅनर दाखवले. हा सर्व राजकीय कारस्थानचा भागा होता” असं तिने म्हटलय. “ज्यांनी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जे कोणी जबाबदार असतील, त्यांना कोर्टात उत्तर द्यावं लागेल” असं सहर शेख म्हणाल्या आहेत.

तहसीलदारांनी चौकशी केल्यानंतर शिफारस

ठाणे तहसीलदार कार्यालयाने सहर शेख यांचे पिता यूनुस इकबाल शेख यांच्याविरुद्ध कथितरित्या खोट्या जात प्रमाणपत्राचा वापर केल्याचा आणि त्याचं आधारावर आपल्या मुलीसाठी जात प्रमाणपत्र मिळवलं म्हणून गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. तहसीलदार उमेश पाटील यांनी या प्रकरणात चौकशी केली. त्यानंतरच शिफारस केली. वर्ष 2011 मधील त्यांचं ओबीसी प्रमाणपत्र अधिकृत प्रारुपाप्रमाणे नव्हतं. त्यावर एसडीओची अनिवार्य स्वाक्षरी नव्हती. त्या प्रमाणपत्रावर स्टेट ऑफ महाराष्ट्र सुद्धा लिहिलेलं नव्हतं. शेख यांचे वडिल आणि काका मूळ उत्तर प्रदेश गाजियाबादचे निवासी असल्याचं चौकशीत आढळून आलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...