Tiranga campaign :’हर घर तिरंगा’ उपक्रमाचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा, अभियान यशस्वी होण्यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या सूचना

स्वराज्य महोत्सवा निमित्त प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.

Tiranga campaign :हर घर तिरंगा उपक्रमाचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा, अभियान यशस्वी होण्यासाठी नियोजन करण्याच्या दिल्या सूचना
'हर घर तिरंगा' उपक्रमाचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 9:24 PM

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा (Amrit Mahotsav)निमित्त केंद्र व राज्य सरकारच्या सुचेनानुसार ठाणे शहरात 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) अभियान (Campaign) शहरात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक घेतली. शहरातील प्रत्येक नागरिकांना या अभियानात उस्फुर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासोबतच व्यापक प्रमाणात अभियान यशस्वी होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुखांना दिल्या. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित बैठकीस अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी, संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त बाळासाहेब चव्हाण, मारुती खोडके, जी.जी गोदेपुरे, प्रकाश रोडे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, वर्षा दीक्षित, अनघा कदम यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

अमृत अभियानांतर्गत शहरात 4 लाख ध्वज लावण्याचे नियोजन

यावेळी महापालिका आयुक्त शर्मा म्हणाले की, स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित ‘हर घर झेंडा’ अमृत अभियानांतर्गत शहरात 4 लाख ध्वज लावण्याचे नियोजन आहे. 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांना स्वतःच्या घरावर स्वयंस्फुर्तीने ध्वज संहितेचे पालन करून राष्ट्रध्वज उभारावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या. दिनांक 11 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सवा निमित्त प्रत्येक नागरिकाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या. सेच ठाणेकरांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहनही शर्मा यांनी केले.

राष्ट्रध्वज सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना ठाणे महापालिकेच्या वतीने मुख्यालय आणि प्रभाग समिती स्तरावर लवकरच राष्ट्रध्वज सशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी विकत घेऊन आपल्या घरावर 11 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राष्ट्रध्वज फडकावयाचा आहे. या उपक्रमात नागरिकांनी ध्वज संहितेचे पालन करावयाचे असून याबाबतची माहिती महापालिकेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार आहे. (The Municipal Commissioner reviewed har ghar tiranga campaign in thane city)