अकोल्यात हॉट एअर बलूनचा थरार....

अकोला :भारतीय मिलिटरीचा एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे शनिवारी दुपारी अमरावती जिल्ह्यातील सोनगाव शिवारात अचानक उतरला. जमिनीपासून सुमारे 10 हजार फुटावर प्रवास करणारे एअर बलून अचानक उतरल्यामुळे गावात हे बलून पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. 10 ते 12 जवान काश्मीर ते कन्याकुमारी, असा प्रवास करत असताना हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी या एअर …

, अकोल्यात हॉट एअर बलूनचा थरार….

अकोला :भारतीय मिलिटरीचा एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे शनिवारी दुपारी अमरावती जिल्ह्यातील सोनगाव शिवारात अचानक उतरला. जमिनीपासून सुमारे 10 हजार फुटावर प्रवास करणारे एअर बलून अचानक उतरल्यामुळे गावात हे बलून पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली.

10 ते 12 जवान काश्मीर ते कन्याकुमारी, असा प्रवास करत असताना हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी या एअर बलूनचे तात्काळ लँडिंग केले. दरम्यान, बलून उतरत असल्याचे दिसताच गावकऱ्यांनी या एअर बलूनभोवती गर्दी केली.

देशातील युवा वर्गाला भारतीय लष्कराच्या जवानांचे साहसी कौशल्य दाखवण्यासाठी भारतीय लष्कराच्या साहसी बटालियनद्वारे उत्तर-दक्षिण भारत दौरा निश्चित करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या या साहसी अभियानाची सुरुवात 6 नोव्हेंबरला जम्मू येथून झाली. जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जवळपास 3,236 किमी अंतराचा हा साहसी प्रवास दोन हॉट एअर बलूनद्वारे पूर्ण करून भारतीय एकात्मतेचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे.

जम्मू येथील झोरावर स्टेडियम येथून दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरू झालेली ही मोहीम देशभरातील जवळपास 31 स्थानकांवर थांबा घेत आपल्या हवेतील साहसाने लक्षवेधी ठरत आहे. या मोहिमेचे आज सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन झाले. अकोलेकरांसाठी हा प्रसंग कुतूहलाचा ठरला.

भारतीय लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे हॉट एअर बलूनने अकोला येथून नांदेडकडे प्रयाण केले. हे एअर बलून संध्याकाळी नांदेडला पोहचणार आहे. उद्या दिवसभर मुक्काम असून नांदेडमध्ये एयर शो होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *