पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या काळात दर्शनासाठी बंद राहणार, विठ्ठल मूर्तीवर होणार संवर्धित लेपन

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या जतन आणि संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून होणार लेपन प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर या काळात दर्शनासाठी बंद राहणार, विठ्ठल मूर्तीवर होणार संवर्धित लेपन
pandharpur vitthal rukmini mandir
| Updated on: Sep 14, 2026 | 6:52 PM

पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 23 ते 25 सप्टेंबर या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे.  23 ते 25 सप्टेंबर या काळात पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीवर संवर्धन लेपन होणार आहे. त्यामुळे 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे मुखदर्शन आणि पदस्पर्श अशा दोन्ही दर्शनासाठी पूर्णपणे बंद असणार आहे.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाच्या दृष्टिकोनातून विठ्ठल मूर्तीवर पूरातत्व विभागाच्या सल्ल्याने रासायनिक लेपण प्रक्रिया होणार आहे. जून महिन्यातच ही रासायनिक लेपण प्रक्रिया होणार होती. मात्र रासायनिक लेपण की आयुर्वेदिक लेपन या प्रश्नावर न्यायालयीन लढाई झाल्यानंतर अखेर कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशाने पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानेच विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया येत्या 23 ते 25 सप्टेंबर रोजी पंढरपुरात होणार आहे असे मंदिर प्रशासनाने कळवले आहे.

पंढरपूर मंदिरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. मंदिरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तींची झिज होत आहे.त्यामुळे ठराविक काळानंतर या मूर्तींना लेपन करण्यात येते.  या काळात मंदिर भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us