मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आता ‘हा’ खासदार, म्हणाला ‘हा ज्याचा त्याचा अधिकार…’

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स झळकले होते. या बॅनर्सची चर्चा सुरु होऊन राज्यात एकच राजकीय धुरळा उडाला होता.

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आता हा खासदार, म्हणाला हा ज्याचा त्याचा अधिकार...
CM EKNATH SHINDE AND DCM DEVENDRA FADNAVIS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jun 20, 2023 | 8:08 PM

औरंगाबाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक नेते, आमदार गुडघ्याला बाशिंग लावून तयार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेतच. या शिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स झळकले होते. या बॅनर्सची चर्चा सुरु होऊन राज्यात एकच राजकीय धुरळा उडाला होता. हा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता दिल्लीत खासदार असणाऱ्या एका नेत्याने मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय. ‘या’ खासदारनेही स्वतंत्र सर्व्हे केला आहे. यात आपणच मुख्यमंत्रीपदासाठी एक नंबरला आहोत असा दावा त्याने केला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी आपणच एक नंबरला आहोत असा दावा करणारा हा खासदार औरंगाबादचा आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील सर्वात चांगला मुख्यमंत्री इम्तियाज जलील होऊ शकतो. मी केलेल्या सर्व्हेत इम्तियाज जलील हा मुख्यमंत्री म्हणून एक नंबरला आहे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राजकीय चर्चेला नवा विषय दिला आहे. मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे आणि तशी इच्छा का असू नये असा सवालही खासदार जलील यांनी केलाय.

औरंगजेब कोण? माहित नाही

औरंगजेब कोण होता हे मला माहित नाही. त्याचा मी काही अभ्यास केलेला नाही. पण, देशाला कसे पुढे न्यायचे याचा मी विचार करत असतो. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील औरंगजेब यांच्या समाधीला भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या कबरीवर जाण्याची बाब समर्थनीय आहे. कोणी कोणत्या ठिकाणी जायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले.

संवैधानिक तत्वाची देशात हत्या

आम्ही जेव्हा कबरीवर गेलो त्याचा खूप हंगामा केला. पण, आता तेच लोक गप्प आहेत. आता का बोलत नाहीत, असा टोला त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना लगावला. सध्या देशात संवैधानिक तत्वाची हत्या होत आहे. शिवाजी महाराजांनी अफजलखानाची कबर तयार केली. माणूस मेला की सर्व वैर संपत असते हीच शिवाजी महाराजांची शिकवण आहे. औरंगजेब कबरीला जे संरक्षण देण्यात आले ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा सरकारने दिले असेही त्यांनी सांगितले.