AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff Case update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; राधा-बबिताच्या एन्ट्रीने सगळे चकीत, दादर कनेक्शनही उघड

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवनवीन माहिती उघड होत आहे. आता या प्रकरणात राधा-बबिताच्या एन्ट्रीने सगळे चकीत झाले आहेत. आरोपींचं दादर कनेक्शन देखील उघड झालं आहे.

Tiger Shroff Case update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; राधा-बबिताच्या एन्ट्रीने सगळे चकीत, दादर कनेक्शनही उघड
tiger shroff news updateImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 9:04 AM
Share

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाने अख्ख बॉलिवूडमध्ये दहशत पसरली आहे. या गोळीबारातून टायगर थोडक्यात बचावला.  आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. टायगर गोळीबार प्रकरणात आता दोन मुलांचाही सहभाग असल्याचे उघड झालं आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या बिश्नोईच्या टोळी तरुणींचा देखील सहभाग असल्याचे उघड झालं आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हल्ल्याशी संबंधित चार जणांना अटक केली आहे. त्यात दोन महिलांचा देखील समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी कुणाल, सुमित, राधा आणि बबिता यांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शस्त्रांचा व्यवस्था करण्यात या चौघांची महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.   याच शस्त्र, पिस्तुलीच्या मदतीने टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता.

कोण आहे राधा अन् बबिता?

मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमध्ये शस्त्राची तस्करी करणाऱ्यांमध्ये राधा आणि बबिता यांचाही हात आहे. दोन्ही मुली गँगसाठी कुरिअरचं काम करायची. राधा आणि बबिता ही उत्तर प्रदेशची राहणारी आहे. त्यांनी मुंबईच्या दादरमध्ये येऊन हल्लेखोरांना शस्त्र पुरवली होती. कुणाल आणि सुमितने शस्त्राची सोय केली होती. तर राधा आणि बबिताने मुंबईच्या दादारमध्ये जाऊन तिन्ही हल्लेखोरांना शस्त्र पुरविली होती. मुंबई पोलिसांनी त्यांना ट्रांजिट रिमांडवर घेतलं. विशेष पथकाच्या एनडीआर टीमने चौघांना कोर्टासमोर देखील हजर केलं होतं.  कोर्टात हजर केल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौघांचा ताबा मागितला होता. मुंबई पोलिसांनी चौघांच्या चौकशीची परवानगी कोर्टात मागितली. त्यानंतर कोर्टाने आरोपींच्या ट्रांजिट रिमांडची मागणी मान्य केली.

टायगर श्रॉफवर रविवारी झाला हल्ला 

अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ हा रविवारी जुहू परिसरात फुटबॉल खेळायला गेला होता. त्यानंतर बाहेर चाहत्यांशी चर्चा करत कारमध्ये बसला. त्यानंतर हल्लेखोरांनी टायगरवर गोळीबार केला. दोघांनी कारच्या समोरून गोळीबार केला. त्यांनी जवळपास 6-7 राऊंड गोळीबार केला. हल्लेखोराची बंदूक जाम झाल्याने टायगर बचावला. या घटनेत टायगरचा ड्रायव्हर आणि इतर एक व्यक्ती जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने संपूर्ण भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!