AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॉकरोच’ची भीती? सरन्यायाधीश प्रमुख पाहुणे असलेला TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; थेट मेल करून…

मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट रोजी 86 वा वार्षिक दीक्षांत समारंभ होणार होता. परंतु हा कार्यक्रम ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. या समारंभासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.

'कॉकरोच'ची भीती? सरन्यायाधीश प्रमुख पाहुणे असलेला TISS चा दीक्षांत समारंभ अचानक रद्द; थेट मेल करून...
TISS AND CJI SURYAKANTImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 01, 2026 | 4:42 PM
Share

CJP Protest : सध्या देशात कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची सगळीकडेच चर्चा आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर आता सीजेपी देशभरात लोकांशी संपर्क साधणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील तरुणांबाबत झुरळांचा उल्लेख केल्यामुळे तरुणांमध्ये संतापाची लाट उसळली आणि या कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. याच कॉकरोच जनता पार्टीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, सरन्यायाधीश प्रमुख पाहुणे असलेल्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अर्थात TISS या शिक्षण संस्थेचा दीक्षांत समारंभ ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. या समारंभाच्या वेळी सीजेपीची निगडीत असणारे आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळेच सुरक्षा तसेच अन्य व्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून हा दीक्षांत समारंभ सध्या स्थगित करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट रोजी 86 वा वार्षिक दीक्षांत समारंभ होणार होता. परंतु हा कार्यक्रम ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. या समारंभासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार होते. मात्र कार्यक्रमाच्या अवघ्या दोन दिवस आधी TISS प्रशासनाने विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे समारंभ स्थगित करण्यात आल्याची माहिती दिली.

संस्थेने नेमके काय सांगितले?

संस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीत काही विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांसमोर आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान CJP आंदोलनाशी संबंधित निदर्शने किंवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणूनच घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. टीसने याबाबत शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. या निवेदनात TISS प्रशासनाने स्पष्ट समारंभाबाबत स्पष्टीकरण दिले. सध्याच्या परिस्थितीत दीक्षांत समारंभ पार पाडणे शक्य नव्हते. विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, मान्यवर पाहुणे आणि संपूर्ण परिसराची सुरक्षा लक्षात घेऊन समारंभ पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असे या निवेदनात सांगण्यात आले.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?