Sanjay Singh : आप खासदार शरद पवारांना भेटून सिल्वर ओक बाहेर आल्यावर, त्याला विचारलं पवार सत्तेत जाणार का? या प्रश्नावर म्हणाला की..VIDEO

Sanjay Singh Meet Sharad Pawar : शरद पवार यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या शरद पवार यांना भेटण्यासाठी विविध नेते येत आहेत. यात स्वपक्षासह दुसर्‍या पक्षांचे नेते सुद्धा आहेत.

Sanjay Singh : आप खासदार शरद पवारांना भेटून सिल्वर ओक बाहेर आल्यावर, त्याला विचारलं पवार सत्तेत जाणार का? या प्रश्नावर म्हणाला की..VIDEO
Sanjay Singh-Sharad Pawar
| Updated on: Nov 13, 2026 | 12:03 PM

महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार सध्या सिल्वर ओक या आपल्या निवासस्थानी आहेत. नुकताच त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शरद पवार यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या शरद पवार यांना भेटण्यासाठी विविध नेते येत आहेत. यात स्वपक्षासह दुसर्‍या पक्षांचे नेते सुद्धा आहेत. कारण शरद पवार यांचे सर्व पक्षीयांशी चांगले संबंध आहेत. आज सकाळी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी सिल्वर ओकवर येऊन शरद पवारांची भेट घेतली.

“शरद पवारांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी आलेलो. आता त्यांची तब्येत चांगली आहे. त्यांनी अन्य मुद्यांवर माहिती घेतली. सभागृह कधीपासून सुरु होणार, SIR चा मुद्दा वोटर लिस्ट, मतंचोरी, दिल्लीत किती मतं कापली गेली याची सर्व माहिती शरद पवारांनी जाणून घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणावर, विधान परिषदेच्या निकालावर बोललो” असं संजय सिंह यांनी सांगितलं. “एक सुखद चांगली भेट झाली. ईश्वराकडे प्रार्थना करतो, शरद पवार यांच्या प्रकृतीला आराम पडावा. पुन्हा ते त्याच ऊर्जेने काम करताना दिसावेत”

Loading...

त्यामुळे प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही

अजित पवार आणि शरद पवार गटाच्या विलिनीकरणावर काही चर्चा झाली का?. “या विषयी बोलणं झालं नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही” असं संजय सिंह यांनी सांगितलं. “SIR, मतंचोरी यावर बोललो. पार्लमेंट सत्र सुरु होणार आहे. यात पवारसाहेब मजबुतीने आवाज उठवतील” असं संजय सिंह म्हणाले.

ती संख्या भाजप, एनडीएकडे नाहीय

डिलिमिटेशन विधेयकावरही संजय सिंह यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं. “डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत हवं. ती संख्या भाजप, एनडीएकडे नाहीय. महिला आरक्षण बिल पास केलं आहे. ते खोटं बोलतायत. महिला आरक्षण विधेयक लागू करण्याची इच्छा असेल तर त्यांनी विद्यमान संख्येवर लागू करावं. डिलिमिटेशनची एक प्रोसेस असते. ते असचं लागू करता येत नाही” असं संजय सिंह म्हणाले. शरद पवार सत्तेत जातील का? यावर संजय सिंह म्हणाले की, ‘ते प्रखर भाजपंविरोधी आहेत’

दोन्ही राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आज दिल्लीत

दोन्ही राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते आज दिल्लीत आहेत. खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे आज दिल्लीत आहेत. स्टँडिंग कमिटीच्या बैठकांसाठी नेते दिल्लीत असल्याची माहिती आहे. खासदार सुनील तटकरे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल फायनान्स कमिटीचे सदस्य आहेत.
सकाळी 11.30 पासून दिल्लीत बैठका पार पडणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us