मालकाने घेतला जगाचा निरोप पण शेवटपर्यंत कुत्र्याने सोडली नाही साथ, हृदयस्पर्शी घटना किल्ले राजगडावर..
मालकाच्या निधनानंतरही पाळीव कुत्र्याने सोडली नाही साथ. पुण्यातील राजगड किल्ल्यावर जिज्ञेश सदाशिव खांडाळकर हे आपल्या पाळीव कुत्र्यासह शनिवारी गड पाहण्यासाठी आले होते. गडावर थकवा जाणवू लागल्याने जिज्ञेश बसले होते. मात्र, त्यावेळी मालकाने जगाचा निरोप घेतला. पण कुत्र्याने शेवटपर्यंत साथ सोडली नाही.

पुण्यातील राजगडावर मालकाच्या निधनानंतरही पाळीव कुत्र्याने सोडली नाही साथ. पुण्यातील राजगड किल्ल्यावर जिज्ञेश सदाशिव खांडाळकर हे आपल्या पाळीव कुत्र्यासह शनिवारी गड पाहण्यासाठी आले होते. गडावर थकवा जाणवू लागल्याने जिज्ञेश बसले होते. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना गडावरून खाली आणण्यात येत असताना त्यांचा पाळीव कुत्रा सतत सोबत राहिला. आपल्या लाडक्या मालकाला काय झाले आहे, याची जाणीव नसली तरी त्याला सोडून जाण्याची कल्पनाही जणू त्या मुक्या जीवाला मान्य नव्हती. या कठीण प्रसंगातही त्यांच्या पाळीव कुत्र्याने अखेरपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. या मुक्या जीवाची निष्ठा पाहून उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले.
माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं हे शब्दांपलीकडचं असतं. विश्वास, प्रेम आणि निष्ठेने जोडलेलं हे नातं किती अतूट असतं, याची हृदयस्पर्शी प्रचिती शनिवारी किल्ले राजगडावर आली. गड पाहण्यासाठी आलेल्या जिज्ञेश सदाशिव खांडाळकर वय 30 यांचा हृदयविकाराच्या झटक्याने जीव गेला. मात्र, या कठीण प्रसंगातही त्यांच्या पाळीव कुत्र्याने अखेरपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. या मुक्या जीवाची निष्ठा पाहून उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले.
गडावर थकवा जाणवू लागल्याने जिज्ञेश बसले होते. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना गडावरून खाली आणण्यात येत असताना त्यांचा पाळीव कुत्रा सतत सोबत राहिला. आपल्या लाडक्या मालकाला काय झाले आहे, याची जाणीव नसली तरी त्याला सोडून जाण्याची कल्पनाही जणू त्या मुक्या जीवाला मान्य नव्हती.
राजगडावरील ही घटना एका पर्यटकाच्या मृत्यूची दुःखद बातमी असली, तरी ज्या मालकाने आयुष्यभर प्रेम दिले, त्याची साथ मृत्यूनंतरही या मुक्या जीवाने सोडली नाही. या निःशब्द निष्ठेने उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले. माणसांनाही न जमणारी निष्ठा एका मुक्या जीवाने आपल्या कृतीतून दाखवून दिली.