तुळजाभवानी आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, तुम्हीही करू शकता वनडे ट्रिप

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असुन हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्माची पवित्र धार्मिक स्थळे आणि लेणी, किल्ले असे वैभव या जिल्ह्यात आहे. सुट्टी व नववर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानी दर्शन आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असून हे ठिकाण उस्मानाबाद पासून 24 तर सोलापूर […]

तुळजाभवानी आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, तुम्हीही करू शकता वनडे ट्रिप
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 11:42 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक महत्त्व असुन हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्माची पवित्र धार्मिक स्थळे आणि लेणी, किल्ले असे वैभव या जिल्ह्यात आहे. सुट्टी व नववर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानी दर्शन आणि नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे असून हे ठिकाण उस्मानाबाद पासून 24 तर सोलापूर पासून 45 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर आहे. (tourists Crowds to see Tulja Bhavani and Naldurg Fort you can also do a one day trip)

सोलापूर, उस्मानाबाद इथं रेल्वे स्थानक आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील अनेक जणांनी कुलदैवत आहे. त्यामुळे नेहमीच इथे भाविकांची गर्दी असते. तुळजापूर येथे मंदिर संस्थानचे विश्रामगृहसह खासगी हॉटेल आहेत. ज्याचा एक दिवसाचा दर 1 हजार ते दीड हजार आहे. तुळजापूर येथील उस्मानाबादी शेळीचे मटन व त्यातील अनेक पदार्थ हे ख्याव्यासाठी मेजवानी आहेत. विशेष म्हणजे तुळजापूर येथे हळद कुंकू, माळ आणि परडी घेण्यासाठी भाविक येतात.

भुईकोट किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

तुळजापूर येथे आल्यावर भाविक नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला पाहायला जाऊ शकतात. तुळजापूर ते नळदुर्ग हे अंतर 40 किमी असून नळदुर्ग किल्ला हा युनिटी मल्टीकॉन या संस्थेने विकसित केला आहे. या किल्ल्याच्या मध्यभागातून बोरी नदी वाहते. यावर नर- मादी हे धबधबे आहेत. जे नेहमी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. या ठिकाणी किल्ल्यात बोटींग व ऍडव्हेंचर स्पोर्टची व्यवस्था आहे.

युनी वंडर्स रिसॉर्ट

नळदुर्ग किल्ल्याच्या शेजारी युनिटी या समूहाचे नदी शेजारी युनी वंडर्स रिसॉर्ट असून इथे हट स्वरूपाचे निवासी व्यवस्था निसर्गरम्य ठिकाणी आहे. या किल्ल्याच्या नदी शेजारी असलेल्या 8 एकर जागेतील रिसॉर्टमध्ये राहण्याची उत्तम सोय असून रात्री शेकोटी पेटवून, संगीत रजनीसह पार्टीची व्यवस्था आहे. प्रति व्यक्ती 1 ते 2 हजार असे राहण्याचे आणि जेवण पॅकेज आहे. या रिसॉर्टवर रात्री छोट्या पार्टी आणि कौटुंबिक संमेलन सुद्धा आयोजित केले जातात. नळदुर्ग किल्ल्यात अनेक मराठी, तेलगू गाण्यासह चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे अनेक जण येथे फोटोसेशन व फोटोग्राफी करण्यासाठी प्राधान्य देतात.

अणदूर गावातील खंडोबा मंदिर

नळदुर्ग पासून अवघ्या 3 किमी अंतरावर अणदूर हे गाव आहे. या ठिकाणी खंडोबा मंदिर आहे. खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह इथे झाल्याच्या अख्यायिका आहे. त्यामुळे तुळजाभवानी, खंडोबा दर्शन आणि नळदुर्ग किल्ला असे एका दिवसात फिरणं सहज शक्य आहे. त्यामुळे पर्यटक या स्थळांना जास्त पसंती देतात.

हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा दर्गा

उस्मानाबाद शहरात हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा दर्गा आहे. हा दक्षिण भारतातील सर्वात मोठे घुमट असलेला दर्गा असून अजमेरनंतर या दर्ग्याला विशेष महत्व आहे. तसेच उस्मानाबाद येथे जैन आणि बौद्ध धर्माच्या लेणीही आहेत. त्या शहरापासून 4 किमी अंतरावर आहेत. अजिंठा वेरूळ लेण्यापूर्वी या ठिकाणी लेण्या खोदण्यात आल्या होत्या. मात्र, सच्छिद्र दगड लागल्याने त्या अर्धवट असून सुस्तिथीत आहेत. उस्मानाबाद शहरापासून अवघ्या 25 किमी अंतरावर रोमन कालीन मोठी बाजारपेठ असलेले तेर हे गाव आहे.

जैन धर्माचे पवित्र असे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर

उस्मानाबाद औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर 60 किमी अंतरावर कुंथलगिरी जैन धर्माचे पवित्र असे भगवान पार्श्वनाथ यांचे मंदिर असून निजाम काळापासून हे क्षेत्र अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित आहे. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. इथला खवापासून बनवलेला पेढा हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

परंडा येथे प्राचीन किल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे प्राचीन किल्ला असून या किल्ल्याच्या चारही बाजूला खंदक आहेत. या किल्ल्यात आजही पुरातन दारुगोळा पाहायला मिळतो. या किल्ल्यापासून सीना कोळेगाव या धरण क्षेत्रात कल्याणस्वामींचा मठ असून येथे दासबोध या हस्त लिखित दुर्मिळ ग्रंथाची प्रत आहे. (tourists Crowds to see Tulja Bhavani and Naldurg Fort you can also do a one day trip)

इतर बातम्या – 

सफर करा मराठवाड्यातल्या ऐतिहासिक वारशाची, जाणून घ्या किल्ल्यांचे शहर ‘लातूर’बद्दल…

नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करताय, तर ‘ही’ आहेत औरंगाबादजवळची मोठी ठिकाणं…

(tourists Crowds to see Tulja Bhavani and Naldurg Fort you can also do a one day trip)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.