नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करताय, तर ‘ही’ आहेत औरंगाबादजवळची मोठी ठिकाणं…

नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ या शहराला नक्की भेट दिली पाहिजे.

नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करताय, तर 'ही' आहेत औरंगाबादजवळची मोठी ठिकाणं...

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे. सध्या कोरोनामुळे फार लांब सहलीच्या योजना आखल्या जात नसतील, तरी महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणी आहेत. मुळातच महाराष्ट्र मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथल्या प्रत्येक शहरात माहिती मिळण्यासाठी तसेच निसर्गाचा आनंद लुटण्यासारखी बरीच ठिकाण आहेत. नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ या शहराला नक्की भेट दिली पाहिजे (Vacation Trip In Aurangabad must visit these place).

महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर पूर्वी फतेहनगर आणि संभाजीनगर म्हणून ओळखले जायचे. औरंगाबाद हे नाव मुघल शासक औरंगजेब याच्या नावाने प्रेरित आहे, ज्याचा शब्दशः अर्थ ‘सिंहासन बांधले’ असा आहे. लोकसंख्येत, औरंगाबाद हे महाराष्ट्रातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे. या शहरात अनेक भव्य आणि बारीक कोरीव काम असलेले दरवाजे स्थित आहेत. जसे की दिल्ली गेट, काळा दरवाजा, रंगीत दरवाजा, पैठन गेट. नेत्रदीपक, शानदार आणि सुंदर दरवाज्यांमुळे हे शहर ‘सिटी ऑफ गेट्स’ म्हणून देखील ओळखले जाते. औरंगाबादमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही आपल्या सुट्ट्या एन्जॉय करू शकता…

वेरूळ लेणी-कैलास मंदिर

औरंगाबादपासून जवळपास 33 किलोमीटर अंतरावर वेरूळची लेणी आहे. इंग्रजांनी वेरुळला एलोरा असे नाव दिले. पुढे या लेण्या एलोरा नावानेच जगप्रसिद्ध झाल्या. येथे एकूण 34 लेणी आहेत. या लेणी तीन धर्माचे प्रतिनिधित्व करतात. यातील 1 ते 10 लेणी बौद्ध धर्माची, 13 ते 20 हिंदू धर्माची तर, 30 ते 34 जैन धर्माची आहेत. यात 16व्या क्रमांकावर कैलास लेणे आहे. डोंगराच्या वरच्या बाजूने सुरवात करुन खालपर्यंत पूर्ण केलेले हे लेणे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याची लांबी 164 फुट, रुंदी 109 फुट व उंची 96 फुट आहे. हे कैलास मंदिर बांधण्याचे कामं तीन पिढ्यांनी इ.स. 578मध्ये पूर्ण केले. एलोरा जागतिक वारसा स्थान असून, भारतीय रॉक-कट वास्तुकलेचे प्रतीक आहे.

घृष्णेश्वराचे मंदिर

एलोरा लेणीपासून एक किमी लांब पल्ल्यावर, 18व्या शतकात बांधलेले, महाराष्ट्रातील भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ‘घृष्णेश्वर’ मंदिर आहे. हे शिवमंदिर असले तरी येथे पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. घृष्णेश्वराचे मंदिर हे अहिल्यादेवींनी उभारले असून, पूर्वाभिमुख आहे (Vacation Trip In Aurangabad must visit these place).

बीबी का मकबरा

बीबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहालाची जणू प्रतिकृतीच आहे. या महालात औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगमची (राबीया-उद-दुर्रानी) कबर असून, ती मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात बनवण्यात आली होती. परंतु, हा मकबरा मलिकाचा मुलगा शहजादा आजम शाहकडून सन 1651 ते 1661 या काळात आईच्या स्मरणार्थ बांधला गेला, असे इतिहासात आढळते. या कबरीवर दिवसा सूर्यकिरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. येथे औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणाऱ्या वस्तू जसे चटई, भांडे, लाकडी फर्निचर, वस्त्र याचे जतन करण्यात आले आहे. बीबी-का-मकबरा स्थापत्य शास्त्रातील अप्रतिम वास्तू असून, मकबऱ्याची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालासारखे आहे.

अजिंठा लेणी

औरंगाबाद शहरापासून 99 किमीच्या अंतरावर वसलेल्या अजिंठा लेणी पर्यटन आणि वारसा क्षेत्राचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसा प्रदर्शनांच्या यादीत या लेणींनी स्थान प्राप्त केले आहे आणि जर तुम्ही औरंगाबादमध्ये असाल तर या लेणीला नक्की भेट दिली पाहिजे. सुमारे 700 वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 1000 वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ 1839मध्ये शिकारीसाठी निघाला होता. यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.

दौलताबादचा किल्ला

दौलताबाद किल्ल्याचे जुने नाव देवगिरी असे आहे. हा प्रसिद्ध किल्ला यादवांनी बांधला होता. सन 1296मध्ये रामदेवरावांच्या काळात तो अल्लाउद्दीन खिलजीने जिंकला. किल्ल्याभोवती खंदक असून, भुयारी मार्गाने आत जावे लागते. किल्ला चढतांना मध्यभाग संपूर्ण अंधाराने व्यापलेला आहे. पूर्वीच्या काळी शत्रुला मारण्यासाठी येथे एक गरम तवा ठेवलेला असे. किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट, शिल्पसंग्रह, बुरुज, हाथीहौद, भारतमाता मंदिर, चांद मिनार, हेमाडपंथी मंदिर, कालकोट चीनी महाल, मेढा तोफ, खंदक, भुयारी रस्ता, गणेश मंदिर, बारादरी, जनार्दन स्वामींच्या पादुका, दुर्गातोफ अशा कितीतरी गोष्टी बघण्यासारख्या आहेत.

(Vacation Trip In Aurangabad must visit these place)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI