Local Bodies Election 2025 Date : राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं, आजपासून आचारसंहिता लागू, कोणासाठी किती जागा आरक्षित?
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण २,८६९ जागांसाठी मतदान होणार असून, राज्य निवडणूक आयोगाने मतदार सुविधांसाठी पोर्टल, मताधिकार ॲप आणि जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना प्राधान्य मिळेल, तसेच निवडणूक खर्चावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली असून, एकूण २,८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये १,४४२ महिलांसाठी, ३४१ अनुसूचित जातीसाठी, ७७ अनुसूचित जमातीसाठी आणि ७५९ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. मतदारांना राज्य निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर आपले नाव आणि Epic क्रमांक टाकून व्होटर्स सर्च सुविधा वापरता येईल.
तसेच, मताधिकार नावाचे एक मोबाईल ॲप (अँड्रॉइडवर उपलब्ध, iOS वर लवकरच) विकसित केले आहे, ज्याद्वारे मतदार आपले नाव, प्रभाग आणि मतदान केंद्र शोधू शकतील. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्या बाळासह स्त्रिया आणि गर्भवती महिलांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर रॅम्प, व्हीलचेअर, वीज, पिण्याचे पाणी, सावली आणि शौचालयासारख्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध असतील.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या

