सफर करा मराठवाड्यातल्या ऐतिहासिक वारशाची, जाणून घ्या किल्ल्यांचे शहर ‘लातूर’बद्दल…

मराठे आणि निजाम यांच्या दरम्यानच्या लढाईच्या खुणा, गुहा, लेण्या, कोरीव शिल्प, किल्ले असा भला मोठा ऐतिहासिक वारसा लातूर शहराने जपला आहे. सध्याच्या सुट्ट्यांच्या कालवधीत या ऐतिहासिक वारशाची सफर नक्कीच केली पाहिजे.

सफर करा मराठवाड्यातल्या ऐतिहासिक वारशाची, जाणून घ्या किल्ल्यांचे शहर ‘लातूर’बद्दल...

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. अशाच ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे लातूर. लातूर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या शहराचा विकास अमोघवर्षा या राजाने केला. मराठे आणि निजाम यांच्या दरम्यानच्या लढाईच्या खुणा, गुहा, लेण्या, कोरीव शिल्प, किल्ले असा भला मोठा ऐतिहासिक वारसा लातूर शहराने जपला आहे. सध्याच्या सुट्ट्यांच्या कालवधीत या ऐतिहासिक वारशाची सफर नक्कीच केली पाहिजे (Vacation Trip In Latur must visit these place).

वर्तुळाकार बाजारपेठ

लातूर शहराच्या मध्यभागी असलेली ‘गंजगोलाई’ ही इमारत खूप प्रसिद्ध आहे. या इमारतीचे बांधकाम 1917मध्ये करण्याचे आले आहे. या वास्तुच्या मध्यभागी ‘अंबाबाई’ देवीचे मंदिर आहे. या वास्तुला गोलाकार रचनेत 16 रस्ते एकत्रित जोडले गेले आहेत. प्रसिद्ध स्थापत्य विशारद फैयाजुद्दीन यांच्या कल्पनेतून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते.

उदगीर

लातूर जिल्ह्यातील उदगीर हे एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. उदगीरला प्राचिन ऐतिहासिक वारसा आहे. 1761मध्ये मराठा आणि हैद्राबादचा निझाम यांच्यात झालेल्या युद्धाची साक्षीदार ही जागा आहे. उदगीरचे प्राचीन नाव ‘उदयगिरी’ असे होते. तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्ला महाराष्ट्रायतील भुईकोट किल्यांपैकी एक आहे. उदगीर नगरीचा उल्लेख पुराण काळापासून सापडतो.

भुईकोट किल्ला

लातूरच्या उदगीर येथील यादवकालीन भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याभोवती असणारा 40 फूट खोलीचा खंदक आणि जमीनपासून 60 फूट खोलीवरील उदयगीर महाराजांची समाधी हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथून जवळच असणाऱ्या देवर्जन येथे श्रीगंगाराम महाराजांची समाधी आहे (Vacation Trip In Latur must visit these place).

हत्तीबेट

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस 16 किमीवर वसले आहे. हत्ती बेटाला पुरातन काळापासून महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी पुरातन मंदिरांबरोबरच गुहा, कोरीव शिल्प मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. हत्ती बेट देवर्जनाला प्रादेशिक पर्यटनाचा दर्जा देखील मिळाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये रझाकारांविरुद्ध स्वातंत्र्यसैनिकांनी युद्ध करून शेवटपर्यंत हत्ती बेट रझाकारांना जिंकू दिले नाही, असा इतिहास सांगितला जातो.

खरोसा लेणी

खरोसा लेणी, लातूर जिल्ह्यात असलेल्या खरोसा नावाच्या खेड्यात आणि लातूर शहरापासून 45 किमी अंतरावरील आहे. या लेणी गुप्ता कालावधी दरम्यान घडवलेल्या शिव पार्वती, रावण, नृसीम्ह्ती आणि कार्तिकय या शिल्पाकृतींसाठी पर्यटक व इतिहासतज्ज्ञांमध्ये प्रसिद्ध आहे. खरोसामध्ये एकूण 12 लेणी आहेत. यातील पहिल्या गुहेत भगवान बुद्ध यांची बसलेल्या मुद्रेतील मूर्ती आहे.

औसाचा किल्ला

बहमनीच्या काळानंतर दख्खनच्या सुलतानांमधील मतभेदांचा साक्षीदार हा औसाचा किल्ला आहे. नंतरच्या काळात मलिक अंबरने ताब्यात घेल्यावर त्याचे नाव बदलून अंबरापूर असे करण्यात आले होते. जे नंतर बदलून अमरावुरमध्ये करण्यात आले. हा प्राचीन औसाचा किल्ला इसवी सन 1200मध्ये विकसित केला गेला होता.

(Vacation Trip In Latur must visit these place)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI