Manmad train accident : मनमाडमध्ये रेल्वे, ट्रकचा अपघात; रेल्वेचा एक डब्बा रुळावरून घसरला

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे अन्नधान्य गोदाम असलेल्या मनमाडच्या एफसीआयमध्ये मालवाहतूक करणारी रेल्वे (Railway) व गोदामात माल भरण्यासाठी आलेला ट्रक यामध्ये अपघात (Accidents) झाला. या अपघातात रेल्वे मालगाडीचा एक डब्बा रुळावरून घसरला.

Manmad train accident : मनमाडमध्ये रेल्वे, ट्रकचा अपघात; रेल्वेचा एक डब्बा रुळावरून घसरला
| Updated on: Jul 09, 2022 | 8:38 AM

मनमाड : आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे अन्नधान्य गोदाम असलेल्या मनमाडच्या एफसीआयमध्ये मालवाहतूक करणारी रेल्वे (Railways) व गोदामात माल भरण्यासाठी आलेला ट्रक यामध्ये अपघात (Accident) झाला. या अपघातात रेल्वे मालगाडीचा एक डब्बा रुळावरून घसरला आहे. सुदैवाने या अपघातात ट्रकचालक थोडक्यात बचावला आहे. मात्र ट्रकचे (Truck)मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोदाम क्रमांक 24 जवळ हा अपघात झाला. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोदामात माल भरण्यासाठी ट्रक आला होता. मात्र त्याच दरम्यान माल वाहतूक करणारी रेल्वे देखील आली. अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक थोडक्यात बचावला आहे. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रेल्वेचा एक डब्बा देखील रुळावरून खाली घसरला.

पनवेल लोकल चुनाभट्टी स्थानकात बंद

दरम्यान दुसरीकडे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलला जाणारी लोकल चुनाभट्टी स्थानकात बंद पडली होती. ही लोकल रात्री अंदाजे  11.24 च्या सुमारास चुनाभट्टी स्थानकात आली, त्यानंतर ती बंद पडली. 35 मिनिटांपेक्षा अधिक काळ ही रल्वे चुनाभट्टी स्थानकातच उभी होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. 35 मिनिटांनंतर देखील लोकल सुरू न झाल्याने अखेर प्रवाशांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर 40 मिनिटांनी दुसरी लोक चुनाभट्टी स्थानकात दाखल झाली. या लोकलने प्रवासी घराकडे रवाना झाले. लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांना तब्बल एक तासांच्या आसपास स्थानकात ताटकळत उभे राहावे लागले. मिळत असलेल्या माहितीनुसार लोकलमध्ये तात्रिंक बिघाड झाल्याने ही लोकल चुनाभट्टी स्थानकात बंद पडली होती. मात्र यामुळे प्रवाशांना मोठा मनस्थाप सहर करावा लागला.