तृप्ती देसाई पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांच्या भेटीला

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मृत पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांच्या भेटीला निघाल्या आहेत. Trupti Desai Will Meet pooja Chavan Family

तृप्ती देसाई पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांच्या भेटीला
तृप्ती देसाई पुजा चव्हाणच्या कुटुंबीयांना भेटणार

बीड :  सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मृत पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांच्या भेटीला निघाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या परळीला जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. तसंच कुटुंबीयांचं सांत्वन करणार आहे. (Trupti Desai Will Meet pooja Chavan Family)

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे. राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोपांची राळ उडतीय. अशातच आपल्या रोखठोक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या तृप्ती देसाई पूजाच्या कुटुंबाला भेटणार आहेत.

पूजाच्या मृत्यू प्रकरणानंतर तृप्ती देसाई यांनी काय भूमिका घेतलीय..?

पूजा चव्हाण हिच्या मृत्यी प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असं म्हणत त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावं, असं मत मांडलं आहे. तसंच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये, असंही त्या म्हणाल्या आहेत.

वनमंत्री आणखी माध्यमांसमोर आले नाहीत

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झालेत त्या संजय राठोडांनी आणखीही माध्यमांसमोर येणं टाळलं आहे. या केसबद्दल एकही शब्द त्यांनी आणखी माध्यमांना सांगितला नाही. गेल्या 13 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत. यावरुनच तृप्ती देसाई यांनी राठोड यांचा समाचार घेतला तसंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पुणे पोलिसांची कारवाई काय?

पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide) आत्महत्याप्रकरणात अरुण राठोड (Arun Rathod) याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी (Pune Police) आज गुरुवारी 18 फेब्रुवारीला अरुणला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पूजाने 7 फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास आत्महत्या केली होती. त्यानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, त्यामध्ये कथित मंत्री आणि अरुण राठोड यांची नावं होती. मात्र अरुण राठोड गायब होता, त्याला अखेर पोलिसांनी पकडलं आहे.

अरुण राठोड-संजय राठोड ऑडिओ क्लिप

अरुण आणि संजय राठोड यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. अरुण राठोड हा पूजा चव्हाणसोबत राहात होता. एव्हाना तिची जबाबदारी अरुणवरच होती. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असं अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजाने एकदा निर्णय घेतला तर ती मागे हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.

पूजा चव्हाणची आत्महत्या

मूळ परळीच्या पूजा चव्हाणचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती भावासोबत पुण्यात रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा :

चंद्रकांतदादांच्या ‘त्या’ विधानामुळे गजहब, राष्ट्रवादीकडून थेट अटलजींच्या ‘राजधर्माची’ आठवण

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, दोन्ही प्रकरणात एकच नाव, कोण आहे अरुण राठोड?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI