तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

FDA Action : तुकाराम मुंढे गेल्या काही काळापासून अॅक्शन मोडमध्ये आहेत. मुंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने राज्यातील विविध ठिकाणी कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केलेली आहे.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल
Tukaram Mundhe FDA Action
Image Credit source: Google
| Updated on: Jul 18, 2026 | 8:49 PM

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही काळापासून अॅक्शन मोडमध्ये आहेत. मुंढे यांच्या नेतृत्वातील पथकाने राज्यातील विविध ठिकाणी कारवाई करत अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केलेली आहे. अशातच आता तुकाराम मुंढे यांच्या पथकाने अकोल्यात केलेल्या गुटखा कारवाई प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. बनावट गुटखा कारखाना प्रकरणात अकोला महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक गई असं गुन्हा दाखल झालेल्या अभियंताचे नाव असून ते भाजपचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विनोद मापारी यांचे सख्खे भाचे आहेत. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अकोल्याच्या राजकारणात खळबळ

अकोल्यात एमआयडीसी परिसरात 2 गुटख्यांच्या कारखान्यावर FDA ने छापे टाकले होते. यावेळी तब्बल दीड कोटींच्या जवळपास मुद्देमाल जप्त झाला होता. तर दोन्ही गुटखा कारखाने राजकीय पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या गौरव शर्मा नामक व्यक्तीचे असल्याचे तपासात समोर आले. सध्या तो फरार आहे. मात्र, दुसरीकडे यातील एक गुटखा कारखाना हा महापालिकेतील कनिष्ठ अभियंता तथा भाजपचे माजी उपमहापौराचा भाचा अभिषेक गई यांच्या मालकीच्या जागेत होता. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले विनोद मापारी

अभिषेक गई याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे माजी उपमहापौर विनोद मापारी यांनी मौन सोडलं आहे. एमआयडीसीतील ते गोदाम अधिकृतपणे 500 रुपयांच्या बॉण्डवर भाडे करारनामा म्हणून भाडेतत्त्वावर दिले होते. मात्र इथे सुरू असलेल्या गुटखा कारखान्याबद्दल मला किंचितही कल्पना नव्हती.

FDA सराईत रॅकेटच्या शोधात

दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. आता आगामी काळात यातील आणखी काही आरोपी सापडण्याची शक्यता आहे.

Follow Us