
दोन मराठी वाघाने एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा… तर नितेश राणेंना डीवचत बॅनरवर मजकूर… देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही… मी तुषार दिलीप रसाळ कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता… ठाण्यातील तिनं हात नका येथे ठाकरे गटाकडून लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय बानला आहे… बॅनर वरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुण्यात वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कँमेऱासोबतच भोंगेही लावलेत शहराच्या गर्दीच्या प्रत्येक चौकात हे भोंगे बसवण्यात आले आहे, या भोंग्यांच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत किंवा व्हीआयपी मुव्हमेंट असतील तेव्हा नागरिकांना सूचना केल्या जातील. याचा उपयोग वाहतूक कोंडी सोडवण्यात देखील केला जाणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र गुरुवारपासून नैऋत्य मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. उद्यापासून चार दिवस शहर परिसरात मेघगर्जना विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
बुलढाणा ब्रेकींग
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात..
मेहकर , चिखली खामगाव तालुक्यात दमदार पावसाला सुरुवात..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर शिवतीर्थसमोर लावण्यात आले होते. हे बॅनर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आले होते. एक बॅनर हा शिवतीर्थसमोर तर दुसरा बॅनर हा सेना भावनासोमोर लावण्यात आला होता. मात्र शिवतीर्थसमोरील बॅनर आता काढून टाकण्यात आलेले आहे. शिवतीर्थवरून सूचना आल्यानंतर हे बॅनर काढून टाकण्यात आलेले आहे.
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी भारती एअरटेलने बुधवारी दावा केला की त्यांनी कर्नाटकमध्ये त्यांची अपग्रेडेड फसवणूक शोध प्रणाली सुरू केल्यानंतर अवघ्या 25 दिवसांत 1.80 लाखांहून अधिक लिंक्स ब्लॉक केल्या आहेत.
राजा रघुवंशी यांचे भाऊ विपिन रघुवंशी यांनी इंदूरमध्ये सांगितले की, “गोविंद (सोनम रघुवंशीचा भाऊ) माझ्या संपर्कात होता. त्याने मला सांगितले की तो माझ्या घरी येईल आणि त्याला त्याच्या बहिणीने चूक केल्याचे कबूल करायचे होते. त्याला असे म्हणायचे होते की त्याच्या बहिणीला तिच्या चुकीबद्दल फाशी देण्यात यावी.”
लासलगाव येथे दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ दिव्यांग क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन केलं. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
वर्ध्यातील आर्वी येथे बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ शेतकरी उतरले आहेत. आर्वीत तहसील कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते शेतकरी बाळा जगताप यांच्यासह शेतकऱ्यांनी अंगावरील कपडे काढत आंदोलन केलं. आता शेतकऱ्यांकडे काही उरलं नसल्याने सरकारने आमचे कपडेच घ्यावे, अशी आंदोलकांची आगळीवेगळी विनंती केली. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह संबंधित 17 मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन दिलं. आर्वी येथे शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात अभिनव आंदोलन करून समर्थन दिलं.
पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते दहिसर दरम्यानची एक तरुण लोकलमधून पडून गंभीर जखमी झाला आहे. लोकलच्या गार्डने कळवल्याने त्याला ॲम्बुलन्सच्या सहाय्याने शताब्दी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती चिंताजनक आहे.
सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची राज्य विधीमंडळाकडून दखल घेण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणी विधीमंडळाच्या समितीपुढे प्रथम सुनावणी असून संबंधितांना सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना. सुनावणीत पोलीस महासंचालक, गृहविभाग सचिवांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
नाशिकमध्ये मुंबई मनमाड उच्च दाब भूमिगत पेट्रोलियम पाईपला छिद्र पाडून इंधन चोरी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वेळीच पोलिसांनी मोठी घटना होण्याआधीच या घटनेचा तपास करत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. या टोळीकडून पाईपलाईनला छिद्र पाडून इंधन व्यवसाय करण्याचा प्रयत्न असल्याचे प्राथमिक तपासात उघड झालं आहे. इंधन पाईपलाईन उच्च दाबाचा असल्याने या चोरी दरम्यान मोठी घटना देखील घडू शकली असती. पेट्रोल चोरीचा उद्देश होता का अजून काही कारण या मागे होतं या सर्व अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पंढरपूर ला आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या भेटीला निघालेली आदिशक्ती संत मुक्ताबाईंच्या पालखीचा आजचा जिल्ह्यातील सहावा दिवस आहे.. आज सकळी पालखी चिखली तालुक्यातील हातणी येथे पोहचली असून हातनी ग्रामस्थ शेकडो वर्षांपासून पालखीला भोजनाची व्यवस्था करतात .
पुण्यात ट्रॅक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात गंगाधाम चौकात हा अपघात झाला आहे. ट्रॅक चालकाने दुचाकीवरील महिलेला उडवल्याने हा अपघात झाला.
पुण्यातील नऱ्हे परिसरात गाड्या जाळण्यात आल्या. पुण्यात मध्यरात्री अज्ञात इसमांकडून पार्किंगमध्ये पार्क केलेल्या दुचाकी पेटवण्यात आल्या. घटनेत ७ दुचाकी वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत.
आयआयटी साठीच्या जेईई या प्रवेश परीक्षेत जळगावचा एल एच पाटील स्कूलचा विद्यार्थी देवेश भैय्या हा ऑल इंडिया रँक मध्ये आठवा आला आहे. या यशाबद्दल देवेश भैय्या याच्यासह त्याचा कुटुंबाचा एल एच पाटील स्कूल च्या वतीने सत्कार करण्यात आला. रँक मध्ये येण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं, मात्र मी तसा कुठला विचार केला नव्हता, फक्त माझ्यातला जे बेस्ट आहे ते देण्याचा मी प्रयत्न केला असं या यशा नंतर देवेश भैय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे
ज्यावेळी संवाद होतो, त्यावेळी वादाला अर्थ उरत नाही, असे म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी अजितदादांशी वाद नसल्याचे म्हटले आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची फोनवरील भाषा ही दादागिरीची असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांना सत्तेची मस्ती असल्याचे ते म्हणाले.
काल केंद्रीय उर्जा मंत्र्यांची जी परिषद झाली यात थर्मल प्लान्ट बायोमास जाळण्याचा संदर्भात चर्चा झाली, अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली. जर बायोमासचा वापर वाढला तर शेतकऱ्यांच्या खिशात १ लाख कोटी जातील. अन्नदाता उर्जा दाता व्हायला हवा असं पंतप्रधान मोदी म्हणतात त्यानुसार काम करायला हवं. बांबूचा बायोमास मध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पटेल म्हणाले.
खासदार नारायण राणे यांच्याकडून आई तुळजाभवानीला कमळाचे फुल अर्पण केले. राणे यांनी सह कुटुंब आई तुळजाभवानी देवीच दर्शन घेतले. आई तुळजाभवानी देवीच दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. नारायण राणेंच्या हस्तेआई तुळजाभवानी देवीची महा आरती करण्यात आली.तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून राणे कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.
मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहातो कोण आहे हा मेंटल प्रकाश महाजन कोण विचारतोय त्याला तो जिथे जाईन तिथे मी जायचं का? असा सवाल खासदार नारायण राणे यांनी केला. त्याची आणि माझी बरोबरी करू नका असेही राणे म्हणाले.
“मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो. ते वक्तव्य चुकीचं असून मी नितेशला समज दिली. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो मला साहेब म्हणू नका, सेवक म्हणा. कोणाचा निधी अडवणं हेदेखील चुकीचं आहे. त्याबाबतही मी सूचना देणार आहे,” असं नारायण राणे म्हणाले.
“अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी केलेले दावे महाराष्ट्रातल्या ओबीसींची आणि सामाजिक न्याय विभागाची दिशाभूल करणारे आहेत,” असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.
“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालण्याएवढं सोपं नाही. अजितदादांचं हे गुलाबी स्वप्न आहे. कारखाने चालवून, उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून राज्याचा मुख्यमंत्री होता येत नाही. असली गुलाबी स्वप्नं अजित पवार यांनी बघू नयेत,” अशी टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर केली.
“परदेशातील दौरा संपल्यावर पंतप्रधान मोदींशी भेट झाली. १ तास अनौपचारिक चर्चा झाली. त्यांनी प्रत्येक खासदाराला वेळ दिला आणि सर्व गोष्टी बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपला संदेश जगभरात पोहोचवला गेला. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही हा संदेश होता. जगभरात भारत एकमेव देश आहे की विरोधक आणि सत्ताधारी सोबत होते,” असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
पश्चिम रेल्वेच्या पॉइंट बिघाडाची दुरुस्ती करण्यात आली असून १०:५५ पासून सर्व गाड्या सामान्य वेळेनुसार धावत आहेत. सकाळी १०.३३ वाजता माहीम येथे पॉइंट बिघाडामुळे ट्रेन उशिराने धावत होत्या. त्यामुळे जलद ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती.
पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 15 मिनिटं उशिराने असल्याचं समोर आलं आहे. माहीम रेल्वे स्थानकाजवळील पॉइंट बिघाडामुळे फास्ट ट्रॅकवरील सेवेवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापासह गर्दीत प्रवास करावा लागत आहे.
बार्शीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पीक विमा कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. पिक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. बार्शीतील पिक विमा कंपनीच्या ऑफिस मधील साहित्यासह खुर्च्यांची शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली. शेतकरी संघटनेचे नेते शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे कमी मिळणे, सोलापूर जिल्हा पिक विम्यातून वगळल्याच्या कारणावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. बार्शी येथील ओरिएंटल पिक विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलन करत साहित्यांची तोडफोड करण्यात आली. सोलापूर येथील विभागीय कंपनीच्या कार्यालयावर आंदोलन केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे तोडफोड करण्यात आली.
मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरिया ईडी चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. डिनो मोरियाला आज चौकशीसाठी ईडीकडून हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे. त्यामुळे डिनो मोरिया चौकशीसाठी जाणार का? याकडे लक्ष असणार आहे.
चांदीच्या दराने पुन्हा नव्या उच्चांक गाठला आहे. जळगाव सराफा बाजारात चांदीच्या दरात तब्बल 2 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 10 हजार 416 रुपयांवर पोहचला आहे. जळगावच्या सराफा बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने 1 लाख 10 हजारांचा आकडा पार केला आहे. चांदीच्या भावात गेल्या आठ दिवसात 9 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 98 हजार 395 रुपयांवर पोहोचलं आहे.
निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांना काल वारजे माळवाडी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं असून आज दोघांना वारजे पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. तपासासाठी दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती पोलीस न्यायालयात करणार आहेत.
धुळे जिल्ह्यातील ड वर्ग महापालिका, नगरपरिषदाकरीता निवडणुकीचे मार्ग मोकळे. धुळे महापालिकेवर आणि जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता. 51 नगरसेवक धुळे महापालिकेत भाजपाचे. यंदा निवडणूक चुरशीची होणार. सर्वच पक्ष वेगवेगळे लढण्याची शक्यता.
आमदार सीमा हिरे यांच्यासह आज देखील भाजप पदाधिकारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. भाजपच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या आणि गिरीश महाजन यांच्या भेटीला. बडगुजर आणि गणेश गीते यांना पक्षात प्रवेश देण्यास पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा विरोध. 7 ते 8 माजी नगरसेवक आणि पदाधिकारी घेणार गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री यांची भेट
वादळी वारा आणि पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील केळी बागांचे प्रचंड नुकसान. खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. नांदेडमध्ये केळी क्लस्टर आणि नुकसान भरपाईसाठी संसदीय अधिवेशनात आवाज उठवणार. नुकसान भरपाई पीक विमा कंपनीच्या खात्यात टाकण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी. काँग्रेसचे नांदेडचे लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांची मागणी.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक गट क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती मोहीम राबवली जाणार आहे. दुय्यम निरीक्षक व लिपिक पदाचा एकूण 137 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय…
कल्याण परिमंडळ ३ आणि टिळकनगर पोलिसच्या विशेष पथकाची कारवाई… डोंबिवली कचोरो रोडवर सापळा रचत रिक्षातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अब्दुल शेख नावाच्या रिक्षा चालकाला २२ ग्रॅम एमडी केले जप्त… अंमली पदार्थांचा मुख्य सूत्रधार पडद्यामागे? पोलिसांकडून शोध सुरू
सध्याच्या कोरोनाचा जो बदल झालेला विषाणू आहे तो खूपच सौम्य असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पुणे महापालिकेला दिली आहे. त्यापासून ज्यांना सहव्याधी आहेत त्यांना काही लक्षणे दिसून येत आहेत. त्यांच्याबाबत योग्य काळजी घेण्यात येत असल्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती…
आत्तापर्यंत कोरोनाचे 959 रुग्ण पूर्णपणे बरे… राज्यात मंगळवारी कोरोनाच्या नवीन 89 रुग्णांची नोंद झाली आहे… यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबई 32 पुणे महापालिका 23 आणि पिंपरी चिंचवड 9 या क्षेत्रातून आहेत… जानेवारीपासून एकूण 1593 रुग्ण आढळले असून त्यापैकी 959 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत… सध्या राज्यात 615 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी बहुतेक रुग्ण घरीच विलीनीकरणात उपचार घेत आहेत..
ओंकार हजारे असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अजित पवार गटाच्या सरचिटणीस पदावर होता. अज्ञात कारणावरून ओंकार हजारे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी रात्री ओंकार हा आपल्या गाडीत बेशुद्धा अवस्थेत आढळून आला. कुटुंबियांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने बेशुद्धावस्थेतच तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचं कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.