
पाचवी पर्यंत मुलाना माराठी भाषेतच शिकवा इतर कोणतीही भाषा शिकवू नये, भाषेला विरोध नाही परंतू लहान वयात मुलांवर तीन भाषांच्या ओझ लादण्याबरोबर नाही… उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असा बॅनर लावण्यात आलेला आहे. अमरावती येथे एसटी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्याची घटना चांदूर येथे घडली आहे. अपघातात सात प्रवासी जखमी झालेत… चांदूर रेल्वे एसटी आगाराची बस बेलोरा या गावी जात असतांना चिंधादेवी फाट्याजवळ अनियंत्रित होऊन निंबाच्या झाडाला धडकल्याची घटना घडली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनाची माहिती मिळतात रात्री 1 वाजता शेफाली हिच्या घरी पोलीस आणि फॉरेंसिक टीम दाखल झाली. रिपोर्टनुसार, शेफालीच्या घरात पोलीस चौकशी करत आहेत. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
नांदेड – बायकोच्या छळाला कंटाळून एकाचा गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न
– नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलावरून गोदावरी नदीत अशोक कांबळे याने मारली उडी
– 20 वर्षापासून बायको शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा चिठ्ठीत आरोप
– जीवन रक्षक दलाच्या जवानांनी वाचवले अशोक कांबळे याचे प्राण
– बायकोने हात मोडला व डोळा अपंग केला चिठ्ठीत अशोक कांबळे याच्याकडून उल्लेख
– अशोक कांबळे याच्यावर नांदेडच्या विष्णुपुरी रुग्णालयात उपचार सुरू
– अशोक कांबळे यांच्या खिशात सापडली चिठ्ठी
भिवंडी – साकिब नाचण यांचे मूळगाव असलेल्या बोरिवली व पडघा या दोन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
कुविख्यात दहशतवादी म्हणून ओळखला जाणारा साकिब नाचण याचे निधन झाल्याची वार्ता पसरल्या नंतर भिवंडी तालुक्यातील साकिब नाचण यांचे मूळगाव असलेल्या बोरिवली व पडघा या दोन्ही ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळपासून मनपाकडून पुन्हा एकदा अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे
ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती
मुदत देऊनही ज्यांनी अतिक्रमण काढली नाहीत
त्यामुळे ते अतिक्रमण आज काढण्यात येत आहेत,
अतिक्रमण काढण्याची कारवाई सध्या जालना रोडवरील मुकुंदवाडी, चिखलठाणा परिसरात सुरू आहे,
अतिक्रमण काढत असताना मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला आहे..
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी शनिवारी सांगितले की, राज्यात लोकप्रिय सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. भाजपच्या राज्य मुख्यालयात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सिंह यांनी मणिपूरमध्ये लवकरच नवीन सरकार स्थापन होईल अशी आशा व्यक्त केली.
दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील अशोक विहार भागातून पाच ट्रान्सजेंडरसह 18 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बंदी घातलेले IMO एप असलेले सात स्मार्ट मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. जे ते बांगलादेशातील त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी वापरत होते.
महाराष्ट्रातील भाजपच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचे नाव 1 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर केले जाईल. यासंदर्भात पक्ष मुख्यालयात बैठकीनंतर अधिकृत घोषणा केली जाईल. पक्षाने या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही घोषणा केली जात आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे.
शेफाली जरीवाला यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव लोखंडवाला येथील त्यांच्या घरी ठेवण्यात आले आहे. नातेवाईक आणि जवळचे लोक त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
हवामान विभागाकडून कोकण, गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर देखील पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता, पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होणार असल्याने या भागातून प्रवास करणाऱ्या आणि फिरायला जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
चिपळूण तालुक्यातील खेरशेत गावात शेत नांगरणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या राज्य स्तरीय स्पर्धेत 181 बैल जोड्या सहभागी झाल्या आहेत. मोठया प्रमाणात स्थानिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.
नांदेडमधील कृषीकेंद्र दुकानदाराची हातचलाखी समोर आली आहे. दुकानदार फुटलेल्या तुर-मुगांची बॅग चिकटपट्टी लावून विक्री करत असल्याचं समोर आलं आहे. नांदेडच्या बारडी येथील कृषीकेंद्र चालकाचा बोगसपणा शेतकऱ्यांनी उजेडात आणला.
शेतकऱ्याला सोयाबीनची काळवंडलेली बॅग दिली, ही माझी चूक झाली. शेतकऱ्याना बोगस बियाणे देणाऱ्या कृषी केंद्र चालकाने माफीनामा मागितला. सदर प्रकरणात सोमवारी कृषी विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारवर मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवरा टीका केली आहे. “महाराष्ट्राला लाचार सरकार लाभलं. मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे असा आग्रह धरायला पाहिजे. मात्र भाजपमधील नेत्यांना मराठीचं प्रेम नाही”, अशा शब्दात खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईमध्ये हिंदी विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी भूमिका मांडली आहे. ‘हिंदी मला येत नाही मी हिंदी बोलणार नाही. मी फक्त मराठीत बोलणार. माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून आई अज्ञान आणि अनपड आहे. माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले मी तेच बोलणार’ असे ते म्हणाले.
विदर्भाच्या शिवसेनेकडे पहिल्यांदा शिंदे साहेब लक्ष देत आहेत असे आशीष जायस्वाल यांनी म्हटले आहे. शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद लावण्याच काम शिंदे साहेब करीत आहेत. शिंदे साहेब यांच्या काळात कुणालाही कमी केलं नाही. कुणासोबत भेदभाव केला नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. कुणाल पाटलांच्या वतीने आज कार्यकर्त्यांचा मेळावा भरवण्यात येणार आहे. मेळाव्यात कुठल्याही काँग्रेस नेत्याचे फोटो नाहीत बॅनर नाही. कुणाल पाटील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर धुळे जिल्ह्यातून काँग्रेसचा पूर्णपणे सुपडा साफ होणार..
मीरा भाईंदर येथे आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विविध कामाचे भूमी पूजन पार पडले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. ‘स्थानिकांना होणाऱ्या खाडीच्या पाण्याचा त्रासाबद्दल मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत’ असे ते यावेळी म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव येथील शिवतीर्थ मंगल कार्यालय येथे आभार मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत. त्यांचे क्रेनमधुन हार घालून स्वागत करण्यात येत आहे.
शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगलेवर दुसरा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ता राणी कपोते हिने मोहन यांना भररस्त्यात चप्पलने मारहाण विनयभंगाचा केला होता गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता कल्याण मधील एका महिलेने मानसिक त्रास देत शिवीगाळ करत विनयभंग केल्याचा गुन्हा बाजारपेठ ठाण्यात दाखल केला.
सर्व माध्यमाच्या शाळेत मराठी शिकवणे बंधनकारक केल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण नुसार वेळोवेळी कागदपत्रे आकडेवारी, पाठीमागचा प्रवास याची माहिती दिली आहे. मराठी आपली मातृभाषा, राज्यभाषा आणि मोदींच्या मार्गदर्शन खाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. ही अभिमानची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
हिंदी सक्तीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून दिव्यात बॅनर लागले. दोन्ही ठाकरे बंधु बॅनरवर एकत्र दिसत आहेत. मुंबई येथील मोर्चामध्ये सामील होण्यासाठी ठाकरे गटाकडून आवाहन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे कल्याण विधान सभा प्रमुख रोहिदास मुंडे यांच्या कडून बॅनर लावण्यात आले आहे.
गोंदिया-कोहमारा महामार्गावरील जानाटोला येथील एका शेतशिवारामध्ये अस्वल झाडावर चढल्याची घटना आज सकाळी घडली. महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांना ही अस्वल दिसली त्यानंतर याची माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना होताच अस्वल पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांतून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ही जागा महामार्गाच्या अगदी शेजारी असल्याने महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांनी देखील अस्वल बघण्याकरिता मोठी गर्दी केली. तर गोरेगाव वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली असून अस्वलीला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गुलाबराव पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादीबाबत मोठे विधान केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, यावर त्यांनी सूचक वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत. हे कोण अमान्य करतं. त्या दोघांमध्ये आय लव्ह यू आहे, असा चिमटा त्यांनी काढला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याबाबत शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले असून यावर मंत्री गुलाबराव पाटील प्रतिक्रिया दिली आहे.
5 जुलै रोजी हिंदीविरोधी मोर्चात सहभागी व्हावे हे निमंत्रण देण्यासाठी मनसे नेते, पदाधिकारी हे रेल्वे स्थानकात पत्रक वाटप करत आहे. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला आहे. त्यांना या मोर्चासाठी मनसेने निमंत्रण दिले.
कर्जमाफीच्या मुद्दावरून महायुती सरकारला गाजराचा हार घालण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचे गळ्यात गाजराचा हार घातलेले पोस्टर याठिकाणी लावण्यात आले आहे. रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला” असं मंत्री दादा भुसे म्हणाले. त्यांची पत्रकार परिषद सुरु असताना त्यांना एकनाथ शिंदे यांचा फोन आला.
बीडच्या उमाकिरण परिसरातील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसात दाखल झाल्यानंतर बीड मधील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे. तात्काळ आरोपींना अटक न झाल्यास सोमवारी बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.
अज्ञात टोळक्याकडून 17 गाड्यांची तोडफोड. दारूच्या नशेत अज्ञात टोळक्याने तोडफोड केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अज्ञात टोळक्याचा शोध सुरू.
मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईची हाक दिले आहे. मुंबई आंदोलनाच्या नियोजनासाठी आंतरवाली सराटी येथे उद्या 29 जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीला राज्यभरातून मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत ९ सामंजस्य करारावर कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केल्या तसेच बी.कॉम रिटेल मॅनेजमेंट, बीएससी अप्लाइड बायोलॉजी, बीए ह्युमेनिटीज अँड सिव्हिल सर्व्हिसेस या तीन अप्रेंटिसशिप एम्बेडेड डीग्री प्रोग्रामसह एम ए ट्रायबल अकॅडमी आणि पी जी डिप्लोमा इन एनजीओ मॅनेजमेंट प्रोग्रामच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करुन या अभ्यासक्रमाच्या प्रारंभाची घोषणा करण्यात आली.
शेतात पेरणी करत असताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावात ही घटना घडली. त्यात संजय भाकरे या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला.
वाशिम जिल्ह्यात 25 आणि 26 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं असून 38 महसूली मंडळातील गावांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस कोसळला असून तब्ब्ल 15303 हेक्टर क्षेत्रावरील नुकतीच पेरणी केलेली पिकं वाहून गेलीत.
जिल्ह्यातील चार तालुक्यांना नक्षलग्रस्तमधून वगळले…. चार तालुक्यांचा समावेश… सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव, तिरोडा या चार तालुक्यांना यातून वगळले… नक्षलवादी कारवायांमध्ये घट….
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आल्या नंतर शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील मोर्चाला पाठिंबा देण्याचे बॅनर ठाण्यातील कळवा शहरात झळकले…. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीने बॅनर झळकवण्यात आले आहे… मराठी अस्मिता जागृत करूया ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र येऊया मराठी भाषेच्या अभिमानासाठी ठाकरे मोर्चा राष्ट्रवादीचा पाठिंबा… अशाप्रकारे बॅनर वरती मजकूर लिहित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देत मोर्चेत सहभागी होणार असल्याचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधत आहे…..