AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा…; उदय सामंत नेमकं काय बोलून गेले? महायुतीतील नेत्यांनाही दिला थेट इशारा

Uday Samant Press Conference: रामदास कदम-प्रसाद लाड वादावर उदय सामंतांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी भाजपसह स्वकीयांनाही सुनावलं आहे.

माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा...; उदय सामंत नेमकं काय बोलून गेले? महायुतीतील नेत्यांनाही दिला थेट इशारा
| Updated on: Oct 23, 2026 | 10:07 PM
Share

मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र 5 विधान परिषदेच्या निवडणूक पार पडली. अमरावतीची जागा आम्ही फार मोठ्या मतांनी जिंकू. सचिन सानप देखील मोठ्या फरकाने निवडून येतील. 5 जागांवर आमचे उमेदवार निवडून येतील. सर्व पदवीधर आणि शिक्षकांना धन्यवाद द्यायचा आहे. वाढीव मतदान हे सचिन सानप यांना विजयापर्यंत नेणारं आहे. शिवसेना कोणत्याही आरोपाच्या भानगडीत पडलेली नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच रामदास कदम आणि भाजपवरही प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास कदमांवर बोलताना उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी या बाबतीतील भूमिका स्पष्ट केली आहे. 500 कोटीचा हा विषय संपला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. रामदास कदम यांनी आपली भावना मांडली असेल. प्रसाद लाड यांनी ही आपली भूमिका मांडली असेल, पण हे कुठे तरी थांबले पाहिजे. रामदास कदम हे वरिष्ठ नेते आहेत. सगळ्या नेते मंडळींना माझी विनंती आहे हे सरकार महायुतीचे आहे, काहीना ते बघवत नाही. दोन्ही संघटनांमध्ये फूट पाडण्याचा कोणी तरी प्रयत्न करत असेल त्याचा विचार व्हावा. रामदास कदम यांचीही ऑडिओ क्लिप असेल तर सध्या AI ची पण असू शकेल. पण सत्य समोर आले पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

भाजपवर बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस चौकशी करून काय म्हणतात हे आम्हाला पाहायचे आहे. त्या भूमिकेची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मग नेते आणि प्रवक्ते काय म्हणतात त्या पेक्षा मुख्यमंत्री महत्वाचे आहे. एकनाथ शिंदेंमुळे मी मंत्री झालो. पण कोणत्याही क्लिप सी जोडू नका. त्यांनी नितेश राणेंनाही उत्तर दिले आहे. उदय सामंत म्हणाले की, प्रत्येकाच्या स्टेंटमेटला उत्तर देण्यापेक्षा मुख्यमंत्री यांची भूमिका महत्वाची आहे. आपापसातील वादामुळे महायुतीमध्ये वाद होऊ नये. ज्यांना ही करायचे आहे ते होऊ देऊ नये.

उदय सामंत म्हणाले की, रामदास भाई हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर प्रसाद लाड दूर करतील. क्लिपची फॉरेन्सिक चौकशी केली जाणार असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. आरोप प्रत्यारोपातून फार काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. माझी मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही. ज्यांनी मला आमदार केले, मंत्री केले त्यांच्या शब्दाच्या त्यांच्या पुढे कधीही जाणार नाही. आज पाच विधानपरिषदेच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं. पुणे शिक्षक भाजपने लढवलेला होता.

आजचं मतदान बघता महाराष्ट्रातील शिवसेनेतील अमरावतीची जागा आणि पुणे शिक्षक मतदार संघांची जागा आम्ही जिंकणार. सचिन सानप निम्मापेक्षा जास्त मत निवडून येतील. पुण्यात 77 टक्के मतदान झालेलं आहे. सांगलीत 97 टक्के मतदान झालेलं आहे. कोल्हापुरात 10 हजार 999 मतदान झालेलं आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवलेला आहे, असं सामंतांनी सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, महायुतीतील एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. 500 व्यवहार झाला अशी क्लिप आहे. एसआयटी नेमून फाँरेन्सिक टेस्ट गेली पाहिजे. फाँरेन्सिक आणि सायबर टेस्ट व्हायला पाहिजे. प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक घेतलेलं आहे. प्रसाद लाड आपल्या भावना मांडत असतील. भाजपला बदनाम करण्यासाठी आमची भूमिका नाही आहे. भाजपच्या नजरेआड काही चाललं आहे तर ती भूमिका आहे. जरांगे आणि आमच्यात तात्विक आहेत. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांनी मुद्दा काढला होता.

महायुतीत तेढ निर्माण होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. माझ्या सारख्या मंत्री महोदयांनी काय म्हटलं यापेक्षा आवश्यकता नाही आहे. जरांगे पाटलांची क्लिप बद्दल चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी झाल्यानंतर आपण सर्व गोष्टीवर बोलू. माझा नेता आणि पक्षप्रमुखांची एकनाथ शिंदे सर्वाच्च पदावर बसले पाहिजेत, अशी माझी भावना आहे. आम्ही प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देणं योग्य ठरणार नाही, असं सामंत म्हणाले आहेत.

उदय सामंत म्हणाले की, दोन्हीही नेत्यांचा सन्मान राहिला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांचा सन्मान राहिला पाहिजे. आमच्या सारख्यांची सन्मान राखण्याची भूमिका आहे. रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत. प्रसाद लाडांनी बोलून गैरसमज दूर केले पाहिजे. मी मुख्यमंत्री , एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे. एकमेकांचे गैरसमज झाले असतील तर ते दूर झाले पाहिजे. हे करून आपण फुट पाडणऱ्यांना संधी देतो आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…