Uddhav-Raj Thackeray Morcha Mumbai LIVE : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची जोरदार तयारी सुरू
Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha Mumbai Live News Updates in Marathi : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त मोर्चाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
अभिजीत दिपकेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- दादरमधील स्थानिक रहिवासी
अभिजीत दिपकेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक रहिवाशींनी केली. कालच्या आंदोलनामुळे वृद्ध व्यक्तीचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं आहे. यावेळी दादर परिसरातील नागरिकांनी दिपकेंवर टीका देखील केली. स्थानिकांची मागणी पोलिसांकडून मान्य होते का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
-
नाशिकमधील मनसे पदाधिकारी मोर्चासाठी मुंबईकडे रवाना
ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चासाठी नाशिकमधून मनसे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चात नाशिकमधील मनसैनिक सहभागी होत आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे रवाना होत आहेत. शेकडो मनसैनिक मुंबईकडे रवाना होत आहेत. घोषणाबाजी करत मुंबईकडे रवाना होत आहे.
-
-
प्रत्येक मुंबईकर मोर्चात सहभागी होणार – ठाकरे गट
ठाकरे गटाचे संतोष शिंदे म्हणाले, आज गर्जना मोर्चा पार पडतोय आमची तयारी पूर्ण झालेली आहे. प्रत्येक मुंबईकर या मोर्चात सहभागी होणार आहे. भायखळा ते सीएसटी असा आधीचा रूट होता, तो काही कारणास्तव बदलण्यात आला. मात्र इथेही मोठी गर्दी होणार आहे.मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व्हावा यासाठी हा मोर्चा आहे. मेट्रो सिनेमाजवळून मोर्चा आम्ही सुरुवात करणार आहोत’.
-
गर्जना मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होणार – नाना पटोले
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधूंच्या मोर्च्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे नाना पटोलेंकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे की, SIR च्या माध्यमांतून आणि मतचोरीच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या काही गडबडी केल्या आहेत, त्याची वस्तुस्थिती आता जनतेसमोर आली आहे. देशातील लोकशाही वाचवणे हे केवळ काँग्रेस पक्षाचेच नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे’.
-
Garjana Morcha : गर्जना मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गर्जना मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मेट्रो सिनेमा चौक ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत हा पायी चालत आंदोलन होणार आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंच आंदोलन आहे. आजच्या आंदोलनात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष सामील होणार आहे.
-
मुंबईत ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. सीएसएमटी समोरील बीएमसी रोडवर ट्रकवर स्टेजची उभारणी सुरू आहे. सीएसएमटी समोरील मेट्रो सिनेमाकडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मेट्रो सिनेमापासून बीएमसी मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहेत. या मोर्चाला मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. सीजेपीचं आंदोलक कार्यकर्ते देखील मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या गर्जना मोर्चाला पांठिबा दिला आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षानेही मोर्चाला पाठिंबा दिला आहे. गर्जना मोर्चासहित देश-परदेशातील घडामोडी जाणून घ्या .
Published On - Oct 04,2026 8:02 AM
