वैष्णवी हगवणे प्रकरण; फरार निलेश चव्हाणविरोधात पोलिसांचा मोठा निर्णय, आता शरण यावच लागणार!

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरारच आहे, त्याच्याविरोधात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे, त्यामुळे तो शरण येण्याची शक्यता आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण; फरार निलेश चव्हाणविरोधात पोलिसांचा मोठा निर्णय, आता शरण यावच लागणार!
nilesh chavan
| Updated on: May 28, 2025 | 6:24 PM

वैष्णवी हगवणे नावाच्या पुण्यातील तरुणीने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा, सासू, पती, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे, मात्र अजूनही एक आरोपी फरारच आहे. निलेश चव्हाण असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.

दरम्यान निलेश चव्हाण याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे, मात्र तो अजूनही पोलिसांच्या हाती लगालेला नाही, सुरुवातीला निलेश चव्हाण याच्या शोधासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र आता पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी आणखी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. पोलिसांच्या सहा पथकांकडून निलेश चव्हाण यााच शोध सुरू आहे. त्यानंतर आता पोलिसांनी फरार असलेल्या निलेश चव्हाण याच्यावर मोठी कारवाई केली आहे. आरोपी निलेश चव्हाण यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यात आलं आहे, त्यामुळे आता त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

स्टँडिंग वॉरंट म्हणजे काय?

आपली ओळख लपवून जर एखादा आरोपी फरार असेल तर त्याच्या स्थावर आणि जगंम मालमत्तेची जाहीर उद्घोषणा केली जाते आणि मालमत्ता जप्त करण्यात येते, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता चव्हाणच्या अडचणी वाढल्या आहेत.

हगवणे कुटुंबाच्या पोलीस कोठडीत वाढ

आज हगवणे कुटुंबाची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं हगवणे कुटुंबाच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी  एका दिवसानं वाढवण्यात आली आहे, तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांची पोलीस कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान कोर्टात युक्तिवादाच्यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून खळबळजनक दावा करण्यात आला, वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला, वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असं वकिलानं कोर्टात म्हटलं आहे. तसेच वैष्णवीला प्लॅस्टिकच्या छडीने मारहाण झाल्याचा दावाही यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलानं केला आहे.