नाशिकच्या कारागृहातील कैद्यांचे होतंय कौतुक, कारागृह प्रशासनाला मिळवून देतात लाखों रुपये

कारागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रगती केंद्रात कमी दरात विविध प्रकारच्या वस्तु मिळत असल्याने नागरिकांची खरेदी साठी मोठी गर्दी होत आहे,

नाशिकच्या कारागृहातील कैद्यांचे होतंय कौतुक, कारागृह प्रशासनाला मिळवून देतात लाखों रुपये
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 12:51 PM

Nashik News : नाशिकचे कारागृह (Nashik Jail) नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. आत्ताही नाशिकचे कारागृह चर्चेत आले आहे. त्याचे निमित्त आहे कैद्यांनी बनविलेल्या विविध वस्तु. दिवाळीच्या निमित्ताने (Diwali Festival) कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी खास स्टॉल लावण्यात आला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांच्या उपस्थित याचे उद्घाटन करण्यात आले आहे. नाशिककरांना या वस्तु कमी दरात कारागृहाच्या प्रवेशद्वारावरील प्रगती केंद्रात खरेदी करता येणार आहे. खरंतर नाशिकच्या कैद्यांनी विविध वस्तु बनवून आपली अंगी असलेली कला जोपासली आहे. गणेश मूर्ती, इंग्लडमधील इस्कॉन मंदिरासाठी सतरंज्या, दिपावलीसाठी सुगंधी उटणे, साबण, आकाशकंदिल आदी केंद्रात उपलब्ध आहेत. फिनेल, ब्रश, सतरंजी, चादरी, फर्निचर आदी गृह उपयोगी वस्तू व शोभेच्या वस्तूही आहेत. कारागृहातील नऊ छोट्या कारखान्यांमधून प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल दरवर्षी मिळतो. या वस्तू दर्जेदार असल्यामुळे ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदाही नागरिकांचा या दर्जेदार वस्तू खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून कैद्यांचे कौतुक होत आहे.

कारागृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या प्रगती केंद्रात कमी दरात विविध प्रकारच्या वस्तु मिळत असल्याने नागरिकांची खरेदी साठी मोठी गर्दी होत आहे,

नाशिकमधील कैदी हे कारागृहात असतांना विविध कला शिकत आहे, गुन्हा करून शिक्षा भोगत असलेले अनेक जन व्यवसाय करणारे आहेत, त्यामुळे ते इतरांना प्रशिक्षण देऊन विविध वस्तु बनवत आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामध्ये सतरंज्या, प्रिटेंड बेडशिट, हातरुमाल, सागाचा बांगडी स्टॅंड, सागाची बैलगाडी, टर्निंग, आणि वाकड्या पायाचा चौरंग, चावी स्टॅंड, सागाची डान्सिंग डाल,

साग पाट, डायनिंग टेबल, शूज स्टॅंड, प्लाय सन दिवान, फिरते बुक स्टॅंड, साग मंदिर, फाईल ट्रे, टिपाय, सागाची फुलदानी, साग स्टॅंड, सागाचा सोफा सेट, सागाचा रिहाळ स्टॅंड,

लहान व मोठे साडी कव्हर, बाटल बॅग, टिफीन बॅग, उशी, गादी, मच्छरदाणी, चेरी बॅग, जॅकेट, लेडीज पर्स, फ्रिज कव्हर, आराम चेअर, पणती, शूज रॅक, मेणबत्ती स्टॅंड, पत्रा सुपडी,

शो पीस, फिनाईल, उटणे, साबण, डिटर्जंट पावडर, क्लिनर, बेल्ट, जप्पल, फायबर बैलजोडी व शेतकरी, राजस्थानी फायबर मूर्ती आदी वस्तु विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.