तुकाराम मुंढे यांनी जे केले ते पाहून सर्वजण स्तब्ध, धावत जाऊन केली विद्यार्थीनीची मदत, थेट..
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या विभागाची राज्यभरात जोरदार कामगिरी सुरू आहे. त्यातच आता तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात त्यांच्याकडून कारवाया केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांना अनेक कार्यक्रमांमध्ये बोलावले जात आहे. अनेकदा त्यांनी आपल्या खासगी आयुष्यावरही भाष्य केले. सततच्या बदल्यांमुळे आपल्या मुलांच्या मनावर काय परिणाम झाला हे तुकाराम मुंढे यांनी अनेकदा सांगितले. दिवाळीपूर्वीही तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून अनेक ठिकाणी धाडी टाकून कारवाया करत अटक करून माल जप्त केला आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधातील त्यांच्या धडाकेबाज कारवायांचं कौतुक आणि चर्चा फक्त महाराष्ट्रातच नाही तर ती देशभरात होत आहे. तुकाराम मुंढे म्हणजे कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
तुकाराम मुंढे प्रचंड शिस्तप्रिय आहेत. ते कोणाचेही गय करत नाहीत. भेसळखोरांच्या कानावर तुकाराम मुंढे यांचे नावही पडता त्यांचा थरकाप उडतो. तुकाराम मुंढे नक्कीच कडक अधिकारी आहेत. मात्र, त्यांच्यातील संवेदनशिल व्यक्ती एका जाहीर कार्यक्रमात दिसून आला. तुकाराम मुंढे यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक त्यांचे जोरदार काैतुक करत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुकाराम मुंढे एका कार्यक्रमाच्या स्टेजवर दिसत आहेत. यावेळी स्टेजवर उपस्थित असणारी विद्यार्थीनी खाली पडते. यादरम्यान काही लोक तिच्या मदतीला धावून येतात. तुकाराम मुंढे हे देखील विद्यार्थीनीच्या मदतीला धावून आले. यावेळी तुकाराम मुंढे विद्यार्थीनीची विचारपूस करताना दिसले.त्यांनी तिला उठण्यासाठी तात्काळ हात दिला.
यासोबतच स्टेजच्याखाली असलेल्या लोकांना त्यांनी शांत राहण्यास सांगितले. तळमळीने तुकाराम मुंढे हे या मुलीकडे धावून गेले. तुकाराम मुंढे यांच्या या व्हायरल व्हिडीओवर लोक मोठ्या संख्येने कमेंट करत आहेत. मोठेपण पदात नाही तर मदतीच्या भावनेत असल्याच्या कमेंट लोकांकडून केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्यातील एक वेगळाच व्यक्ती यावेळी बघायला मिळाला. तुकाराम मुंढे यांचे जोरदार काैतुक केले जात आहे.