Video : बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजतानाचा व्हिडीओ व्हायरल, वन कर्मचारी अशोक घुलेंचं सर्वत्र कौतुक

अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात 3 महिन्याचे 3 बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत. या बछड्यांना वन विभागाचे कर्मचारी अशोक घुले यांनी पाणी पाजलं. त्याचाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Video : बिबट्याच्या बछड्याला पाणी पाजतानाचा व्हिडीओ व्हायरल, वन कर्मचारी अशोक घुलेंचं सर्वत्र कौतुक
वन कर्मचाऱ्याने बिबट्याच्या बछड्यांना पाणी पाजलंImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 11:57 PM

अहमदनगर : बिबट्या (Leopard) म्हटलं की अनेकांना घाम फुटतो, तर अनेकांचा पाचावर धारण बसते. त्यात माणसांनी केलेल्या जंगलतोडीमुळं आणि उभारलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे हल्ली अनेक वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरत असल्यानं त्यांची भीती अधिकच वाढली आहे. अशावेळी वन्य प्राण्यांबाबतच्या काही घटना, काही व्हिडीओ आपल्याला सुखावून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. अकोले तालुक्यातील टाकळी गावच्या जंगलात 3 महिन्याचे 3 बिबट्याचे बछडे (Leopard calves) आढळून आले आहेत. या बछड्यांना वन विभागाचे कर्मचारी अशोक घुले यांनी पाणी पाजलं. त्याचाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

अकोले तालुक्यातील टाकळी गावाच्या परिसरातील जंगलात बिबट्याचे 3 बछडे आढळून आले आहेत. हे बछडे तीन महिन्याचे असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलं. कर्मचारी अशोक घुले यांची ही माहिती वन क्षेत्रपाल प्रदीप कदम यांना दिल्यानंतर कदम यांनी बछड्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर या बछड्यांना वन विभागाचे कर्मचारी अशोक घुले यांनी बाटलीने पाणी पाजलं. साधारण दोन मिनिटाच्या या व्हिडीओ अशोक घुले हे एका टोपल्यात पाणी ठेवताना पाहायला मिळतात. मात्र, बछडे त्या टोपलीतील पाणी पिण्यासाठी पुढे येत नाही. तेव्हा अशोक घुले यांनी बाटलीतूनच या बछड्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो बछडा पंजा मारण्याचाही प्रयत्न करताना दिसतो आणि डरकाळीही फोडतो. मात्र, अशोक घुले यांनी न घाबरता त्या बछड्याला पाणी पाजल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून अशोक घुले यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा

मालेगावतही आढळले होते बिबट्याचे बछडे

चार दिवसांपूर्वीच अशीच एक घटना मालेगावत घडली होती. त्याचं झालं असं की मालेगावातील एका शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले. हे बछडे आठवडाभर शेतकरी कुटुंबाच्या मायेखाली वाढल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. या बछड्यांची आई म्हणजेच मादी बिबट्या परत न आल्याने शेतकरी कुटुंबानं हे बछडे वनविभागाच्या स्वाधीन केले. यावेळी शेतकरी कुटूंबालाही गहिवरून आलं होतं.

मालेगावच्या मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ मांजरीच्या पिल्लासारखं दिसणारं एक पिल्लू घरातील लहान मुलांना दिसलं. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असल्याने घरातील लहानगेही या पिलासोबत खेळू-बागडू लागले. ते पिल्लूही ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांसोबत चांगलंच रमलं. मात्र, हे मांजरीचं पिल्लू नसून बिबट्याचे बछडे असल्याचं लक्षात येताच घरातील लोकांना चांगलाच घाम फुटला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.