AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nail Care Tips : नेल कटर शेअर करताय? सावधान! तुम्ही इन्फेक्शनला बळी पडाल, जाणून घ्या खास टिप्स

डॉक्टर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छता राखण्याची कुणाच्या वैयक्तिक वस्तू न वापरण्याचा सल्ला देताता.

Nail Care Tips : नेल कटर शेअर करताय? सावधान! तुम्ही इन्फेक्शनला बळी पडाल, जाणून घ्या खास टिप्स
नेल कटर शेअर करताय? सावधान!Image Credit source: twitter
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 15, 2022 | 10:54 PM
Share

मुंबई : नखांची काळजी (Nail Care) घेतलीच पाहिजे. पण काळजी घेताना आपण काही चुका करतोय का, याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. संसर्ग (Infection) फक्त खोकल्याने, शिंकण्यानं किंवा इतर माध्यमातून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. काहीवेळा तो वैयक्तिक वापराशी (personal use) संबंधित गोष्टींचा वापर करून देखील पसरू शकतो. म्हणून बहुतेक डॉक्टर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी स्वच्छता राखण्याची कुणाच्या वैयक्तिक वस्तू न वापरण्याचा सल्ला देताता. असे असूनही सौंदर्यप्रसाधने आणि नखांच्या काळजीशी संबंधित गोष्टी शेअर करण्यास टाळाटाळ करत नाही. ज्यामुळे त्वचा किंवा नखांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. आपण अगदी सहज त्या वस्तू वापरतो. मात्र, यातून देखील इन्फेक्शन होऊ शकते.

नखं ​​वाढवण्याची आवड

तुम्हाला नखं ​​वाढवण्याची आवड असली किंवा नखे ​​वाढत नसली तरी त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. अनेक लोकांच्या नखांमध्ये घाण साचते, ज्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जर तुम्ही नखे कापण्यासाठी वापरण्यात येणारा नेल कटर वापरला असेल तर तुम्हाला संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला नखांची काळजी घेण्याशी संबंधित काही टिप्स सांगणार आहोत.

नेल कटर शेअर करू नका

नेल कटर सहसा मोठी नखे कापण्यासाठी वापरला जातो. अशा स्थितीत नखांखाली धूळ, माती आणि प्रदूषणामुळे बॅक्टेरिया, जंतू, बॅक्टेरिया आणि विषाणू जमा होतात. जे फक्त अन्नाद्वारे तुमच्या शरीरात जात नाहीत तर नेल कटर वाटून घेतल्याने हे संक्रमण इतर लोकांमध्येही पसरतात.

नेल क्लिपर वापरा

नखं कापायची असेल तर नेहमी स्टेनलेस-स्टील नेल क्लिपर वापरा. हे नेल क्लिपर नखांसोबतच नखांखाली जमा झालेले बॅक्टेरियाही काढून टाकतात. नखे कापल्यानंतर हात आणि नखेखालील त्वचा साबणाने पूर्णपणे धुण्यास विसरू नका.

अतिप्रमाणात वापर

नेल रिमूव्हर, हँड सॅनिटायझर किंवा केमिकलयुक्त साबण यांचा अतिप्रमाणात वापर केल्याने हातांसोबतच नखांचा मॉइश्चरायझरही संपतो. अशा स्थितीत हात धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. त्यामुळे नखांमध्ये ओलावा टिकून राहील आणि तुमची नखे निरोगी राहतील.

नखे चावू नका

तज्ञांच्या मते, नखे चघळणे हे अस्वस्थतेचे प्रतीक आहे. मात्र, ही सवय आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक आहे. नखे चघळल्याने नखांमधील सर्व जंतू तोंडातून शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल