AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घर बांधून देतो’, विश्वजित कदमांची ऑफर; विवेकानंद पाटील थेट म्हणाले…, Video व्हायरल

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील विवेकानंद पाटील यांच्या भाषणातील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. अशातच आता विश्वजित कदम यांनी पाटील यांना घर बांधून देण्याची ऑफर दिली. पण पाटलांनी दिलं खास उत्तर.

‘घर बांधून देतो’, विश्वजित कदमांची ऑफर; विवेकानंद पाटील थेट म्हणाले..., Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 06, 2026 | 4:14 PM
Share

पुण्यात सध्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील विद्यार्थी आक्रमक झाले असून, या आंदोलनात अनेक विद्यार्थी आणि राज्यातील अनेक नेते सहभागी होताना दिसत आहेत. याच आंदोलनातून विवेकानंद पाटील हे नाव सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांची आक्रमक भाषणशैली आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांसह अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे.

विवेकानंद पाटील आपल्या भाषणातून एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरताना दिसत आहेत. त्याचबरोबर सरकारवरही ते आपल्या खास शैलीत टीका करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून, त्यांच्या वक्तृत्वाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

विश्वजित कदमांनी दिली घर बांधून देण्याची ऑफर

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी विवेकानंद पाटील यांच्या वक्तृत्वाची आणि आंदोलनातील भूमिकेची चर्चा झाली. विवेकानंद पाटील यांचं भाषण करण्याची पद्धत विश्वजित कदम यांना प्रचंड आवडती. ते म्हणाले की, मला कोणीतरी विवेकानंद पाटील यांच्या घराचा व्हिडीओ दाखवला. त्यांच्या घरात अनेक सन्मानचिन्ह देखील बघायला मिळाले. त्यामुळे मी माझ्या वतीने विवेकानंद पाटील यांना चांगलं घर बांधून देणार आहे. त्यांचं यावर काय मत आहे मला माहिती नाही पण मला त्यांना चांगल घर बांधून देयाचं आहे असं विश्वजित कदम म्हणाले.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विश्वजित कदम आणि विवेकानंद पाटील यांच्यातील या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या या प्रसंगाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात विवेकानंद पाटील यांचे भाषण आणि त्यांची आक्रमक भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या भाषणांचे व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता विश्वजित कदमांची ऑफर आणि त्यावर विवेकानंद पाटील यांनी दिलेला नकार यामुळे या प्रकरणाची चर्चा आणखी रंगली आहे.

Follow Us
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ
पोलिसांकडून आम्हाला धमकी, राहुल गांधींच्या आरोपांनी खळबळ, विरोधकांच्या मोर्चामुळे राजधानीत वातावरण तापलं!
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....