मोठी घोषणा! विवेकानंद पाटील विधानसभा लढवणार, भाजपाच्या बाहुबली नेत्याला पाडणार, मतदारसंघ ठरला

ते (चंद्रकांत पाटील) कुठले आहेत हे मला माहितीय. त्यांनी कोल्हापूरच्या कोणत्याही विधानसभेतून फॉर्म भरावा. हा पठ्ठ्या अपक्ष उभा राहील, असं खुलं आव्हान विवेकानंद पाटीलने दिलं.

मोठी घोषणा! विवेकानंद पाटील विधानसभा लढवणार, भाजपाच्या बाहुबली नेत्याला पाडणार, मतदारसंघ ठरला
chandrakant patil and vivekanand patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 3:31 PM

Vivekanad Patil : गोकुळ दूध संघामुळे सध्या चांगलंच राजकारण तापलंय. सरकारने गोकुळवर चार संचालक नेमण्याचं ठरवलंय. हे चार संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देत गोकुळची सत्ता हिसकावण्याचा कट महायुती सरकारचा आहे, असा आरोप होतोय. इतरही काही सहकारी संस्थांसाठी हा निर्णय लागू असेल. तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. सरकारच्या याच धोरणावर सतेज पाटील आक्रमक झालेत. त्यांनी कोल्हापुरात आज (10 नोव्हेंबर) संघर्ष मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात सडेतोड भाषण करणारा विवेकानंद पाटील हादेखील उपस्थित होता. त्याने त्याच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल मोठे संकेत दिलेत. तो भविष्यात विधानसभेची निवडणूक लढवू शकतो.

विवेकानंद पाटीलचं चंद्रकांत पाटलांचं आव्हान

विवेकानंद पाटीलने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते रोहित पवार यांच्या नेतृत्त्वातील एमपीएससी आंदोलनात जोरदार भाषण करून वातावरण निर्मिती केली होती. तो दोन-दोन तास भाषण करत होता. दरम्यान आता सतेज पाटलांच्या मोर्चातही विवेकानंद पाटीलने तुफानी भाषण करत महायुतीला घेरलं. यावेळी विवेकानंदने भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव घेत त्यांना खुले आव्हान दिले. मी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी विवेकानंदने मिश्कीलपणे सांगून टाकले.

Loading...

नेत्याला गोकुळचं चॉकलेट सापडलं नाही का?

आपल्या भाषणात बोलताना, “काल मी एका नेत्याचा फोटो पाहिला. हा नेता अमुल कंपनीचं चॉकलेट देत होता. का बरं. या नेत्याला गोकुळचं चॉकलेट सापडलं नाही का? नुसतं अमुल अमुल करत आहेत,” असा टोला विवेकानंद पाटीलने लगावला.

तर मी कोथरुडमधूनच अपक्ष लढणार

सोबतच, ते (चंद्रकांत पाटील) कुठले आहेत हे मला माहितीय. त्यांनी कोल्हापूरच्या कोणत्याही विधानसभेतून फॉर्म भरावा. हा पठ्ठ्या अपक्ष उभा राहील, असं खुलं आव्हान विवेकानंद पाटीलने दिलं. किंवा चंद्रकांत पाटलांच्या कोथरूडमधूनच अपक्ष म्णून फॉर्म भरून टाकतो, असंही विवेकानंद पाटीलने थेट सांगूनच टाकलंय. त्यामुळे आता विवेकानंद पाटील 2029 सालची विधानसभा निवडणूक लढवणार का? तो जर निवडणूक लढवणार असेल तर कोणता पक्ष त्याला तिकीट देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us