Wardha Rain : वर्ध्यात पूर पहायला गेले अन् पाण्यात बुडाले, एकाचा सापडला मृतदेह तर दुसऱ्याचा शोध सुरू

धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरु करण्यात आला आहे. यामुळे आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी कौढण्यपूर राज्यमार्ग बंद झाला. यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Wardha Rain : वर्ध्यात पूर पहायला गेले अन् पाण्यात बुडाले, एकाचा सापडला मृतदेह तर दुसऱ्याचा शोध सुरू
वर्ध्यात पूर पहायला गेले अन् पाण्यात बुडाले
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Jul 10, 2022 | 2:33 PM

वर्धा : शनिवारी मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. शहरातील नाल्याला आलेला पूर पाहण्यासाठी गेलेले दोन चिमुकले पाण्यात बुडाले आहे. ही घटना वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाच मृतदेह सापडला आहे तर दुस-याचा शोध सुरु आहे. पुलगाव (Pulgaon) येथील बरांडा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पूर आला होता. हा पूर पाहण्यासाठी येथीलच प्रणय जगताप (वय 14 वर्ष ) आणि आदित्य शिंदे (वय 15 वर्ष ) हे दोघेही गेले होते. दरम्यान हे दोन्ही चिमुकले पुराच्या पाण्यात सापडल्याने वाहून गेले. यापैकी प्रणय जगताप (Pranay Jagtap) या मुलाचा मृतदेह सापडला. आदित्य शिंदे (Aditya Shinde) या मुलाच्या मृतदेहाचा शोध प्रशासनाकडून घेतल्या जात आहे.

विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे भाविक अडकले

शनिवारी जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केलाय. मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरु करण्यात आला आहे. यामुळे आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी कौढण्यपूर राज्यमार्ग बंद झाला. यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्याच्या कोंडाण्यापूर याला ओळखल्या जाते. आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. बाकळी नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा जिल्ह्यातून जाणारे भाविक येथे अडकले आहे.

नदीच्या पलीकडूनच विठ्ठलाला साकडं

कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून या पुलावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विठ्ठलची पूजा करण्याकरता जाणारे भाविक पुलावर पाणी असल्याने अडकून पडले आहेत. काही भाविक नदीच्या पलीकडूनच भजन कीर्तन करून विठ्ठलला साकडे घालत आहेत. सकाळपासून या पुलावरून पाणी असल्याने अनेक भाविक पाणी ओसरण्याची वाट पाहत आहे. शनिवारी आलेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.