AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगरूळपीर-अकोला मार्गावर भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू

जागीच दोघांचा जीव गेला. इतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. ऑटोने पलटी मारली. यावरून अपघाताची भीषणता समजते.

मंगरूळपीर-अकोला मार्गावर भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 04, 2023 | 10:31 AM
Share

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर – अकोला महामार्गावरील पार्डी ताड फाट्याजवळ भरधाव ट्रॅक्टरने ऑटोरिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामधील गंभीर जखमींना मंगरुळपीर आणि अकोला येथील दवाखान्यात दाखल केलं आहे. या अपघातामध्ये ऑटोरिक्षाला ट्रॅक्टरने जबर धडक दिल्यानंतर ऑटोरिक्षाने दोन पलट्या मारल्या. या ऑटोरिक्षामधील सर्व प्रवासी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड गावातील आहेत.

ट्रॅक्टर ऑटोला धडकला

ही घटना ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागात रस्ते अरुंद असतात. अशावेळी दोन वाहन जात असतील, तर वाहन पुढं काढणं कठीण होते. शिवाय समोरून वाहन येण्याची शक्यता कमी असल्याने काही जण भरधाव वाहन चालवतात. ट्रॅक्टरचालक जोराने जात होता. तेवढ्यात ऑटोरिक्षाला धडकला. ही धडक येवढी मोठी होती की, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले.

जखमी अकोला येथील रुग्णालयात

हा अपघात येवढा भीषण होता की, जागीच दोघांचा जीव गेला. इतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. ऑटोने पलटी मारली. यावरून अपघाताची भीषणता समजते. लगेच गावकरी धावले. त्यांनी जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.

सर्व प्रवासी पार्डी ताड येथील

या अपघातातील सर्व प्रवासी हे पार्डी ताड येथील होते. दोन जणांच्या मृत्यू झाल्याने गावात शोककळा परसली आहे. गावातील बरेच लोकं रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णांची काळजी घेत आहेत. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह गावात परत आणले जातील. पार्डी ताड गावावर शोककळा पसरली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...