AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह, आठवलेंचं मोठं वक्तव्य, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काय म्हणाले?

रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत, त्यासाठी माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह, आठवलेंचं मोठं वक्तव्य, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2025 | 5:19 PM
Share

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला भेट दिली आहे, तीन महिन्यांमधील ही  ठाकरे बंधूंची सातवी भेट आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झालं आहे. यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकतेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ठाकरे बंधुंच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले 

रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहेत, प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही,  ठाकरे बंधूप्रमाणेच आमच्याही भेटी वाढल्या पाहिजेत, असं आठवले यांनी म्हटलं आहे, पुढे बोलताना ते म्हणाले की, ऐक्य हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे, माझ्या आवडीचा विषय आहे, पत्रकारांच्या आवडीचा विषय आहे, परंतु आता शिवसेनेमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात. राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात, पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे. मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगितलं आहे, प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं. मला वाटतं जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत, तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे ‘मातोश्री’वर 

दरम्यान आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मातोश्रीवर हजेरी लावली आहे, राज ठाकरे सहकुटुंब आज मातोश्रीवर दाखल झाले.  गेल्या तीन महिन्यांमधील दोन्ही ठाकरे बंधुंची ही सातवी भेट आहे. सरकारने त्रीभाषा सुत्रीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर आले होते, त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधुंच्या भेटीगाठीला सुरुवात झाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...