धनुष्यबाणावरील सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद, महेश जेटमलानी यांनी काय सांगितलं?

| Updated on: Jan 17, 2023 | 6:19 PM

आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्याव्यतिरिक्त काही झालं नाही. ते युक्तिवाद करत होते. कागदपत्रांवर कोणतेही ऑप्जेक्शन घेण्यात आले नाही. पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.

धनुष्यबाणावरील सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद, महेश जेटमलानी यांनी काय सांगितलं?
महेश जेटमलानी
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेनेतील फुटीनंतर चिन्ह कुणाचा यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) प्रकरण सुरू आहे. आज सुनावणीदरम्यान सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेटमलानी यांनी युक्तिवाद केला. महेश जेटमलानी (Mahesh Jethmalani) म्हणाले, एकनाथ शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रृटी नाहीत. ठाकरे गटाचा आरोप चुकीचा आहे. सादीक अली प्रकरणाचा जेठमलानी यांच्याकडून दाखला देण्यात आला. धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्हासाठी आवश्यक बहुमत शिंदे गटाकडं असल्याचं महेश जेटमलानी यांनी म्हंटलं.

आमदारांचे बहुमत शिंदे गटाकडे

पक्षाचा मोठा गट लोकप्रतिनिधींसोबत बाहेर पडल्यास बेकायदेशीर कसा, असा युक्तिवाद महेश जेटमलानी यांनी निवडणूक आयोगासमोर केला. आमच्याकडं संख्याबळ जास्त त्यामुळं चिन्हाचा निर्णय तातडीनं घ्यावा,अशी विनंती शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली. आमदार आणि खासदार यांचे बहुमत शिंदे गटाकडं आहे.

धनुष्यबाण चिन्हे शिंदे गटाला हवे

धनुष्यबाणावर आता २० जानेवारीला सुनावणी होणार आहे. आज दोन्ही गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. पण, कोणताही निर्णय झाला नाही. धनुष्यबाण चिन्हासाठीचं आवश्यक बहुमत हे शिंदे गटाकडं असल्याचा युक्तिवाद जेटमलानी यांनी केला. त्यामुळ धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटालाचं द्यायला हवं, असंही जेटमलानी म्हणाले.

२० जानेवारीला पुढील सुनावणी

ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. तर आमच्याकडं संख्याबळ जास्त चिन्हाचा निर्णय तातडीनं घ्यावा, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेटमलानी यांनी केला. दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणताही निर्णय दिलेला नाही. आता २० जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

महेश जेटमलानी म्हणाले,…

महेश जेटमलानी म्हणाले, आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्याव्यतिरिक्त काही झालं नाही. ते युक्तिवाद करत होते. कागदपत्रांवर कोणतेही ऑप्जेक्शन घेण्यात आले नाही. पुढील सुनावणी २० जानेवारीला होणार आहे.