Gokul Milk Union Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षनिवडीच्या काही तासाआधी मोठा ट्विस्ट; सतेज पाटील यांचं टेन्शन वाढलं

गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष कोण होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. महायुतीच्या खेळीने सतेज पाटलांचं टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Gokul Milk Union Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षनिवडीच्या काही तासाआधी मोठा ट्विस्ट; सतेज पाटील यांचं टेन्शन वाढलं
Gokul news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 10:48 AM

कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापुरातील गोकूळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यात गोकूळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज विशेष सभेचं आयोजन करण्यात करण्यात आलं आहे. या सभेला महायुतीचे 12 संचालक येणार का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे गोकूळ दूध संघावर सत्तास्थापन करण्याचा मानस असलेल्या सतेज पाटील यांचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे.

गोकूळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी विशेष सभा ही आज गुरुवारी 11 वाजता आयोजित केली आहे. गोकुळ अध्यक्ष निवड सभेच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना अजिंक्यतारा कार्यालयात जमण्याचे आवाहन केलं आहे. त्यानंतर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्व विचार आघाडीचे 13 संचालक आणि कार्यकर्ते एकत्र सभेसाठी निघणार आहेत. अजिंक्यतारा कार्यालयात कार्यकर्ते दाखल व्हायला देखील सुरुवात झाली आहे. तर नवनिर्वाचित संचालक देखील पोहोचत आहेत. या सभेला महायुतीचे 12 संचालक हे उपस्थित राहणार का, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे महायुतीचे 12 संचालक उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या खेळीने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या सतेज पाटील यांची टेन्शन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

गोकुळच्या 350 कर्मचाऱ्यांना दणका 

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या 350 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी रजा न घेता निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याने प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 ते 19 ऑक्टोबरदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी रजा मंजूर करून न घेता गैरहजर राहिले होते.  दूध संघाचे काम सोडून आजी-माजी संचालकांसाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नोटीस धाडण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी निवडणुकीसाठी दांड्या मारल्याने गोकुळ मधील कामकाजावर मोठा परिणाम झालाय. गैरहजर राहिल्याने या कर्मचाऱ्यांऐवजी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून कामे करून घ्यावी लागली.  या प्रकरणी प्रशासनाने 350 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. गोकुळ दूध संघाच्या प्रशासनाच्या कारवाईची देखील चर्चा होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us