शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंनी पक्षफुटीवेळी घेतलेला तो निर्णय ठरणार टर्निंग पॉइंट? कपील सिब्बल यांचा न्यायालयात युक्तीवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंनी पक्षफुटीवेळी घेतलेला तो निर्णय ठरणार टर्निंग पॉइंट? कपील सिब्बल यांचा न्यायालयात युक्तीवाद
Uddhav Thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 3:55 PM

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांनी संपूर्ण घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला आहे. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झालं, त्यानंतर हे आमदार सुरतला गेले,  सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता.  तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे.

कपिल सिब्बल न्यायालयात काय म्हणाले? 

सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग झालं, त्यानंतर हे आमदार सुरतला गेले,  सुरतहून हेच आमदार गुवाहाटीला गेले हा काही योगायोग नव्हता.  तेव्हाच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर केलं. एकनाथ शिंदेंनंतर  अजय चौधरींची ठाकरेंनी विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती केली. व्हिप म्हणून सुनील प्रभूंनी आमदारांची बैठकही बोलावली. निवडणूक आयोगानेच शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.  बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनीच पक्षाची सूत्र स्वीकारली.  पक्षघटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केली
नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा देखील उल्लेख करण्यात आला होता.  विधिमंडळात कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे आहे, असा युक्तिवाद यावेळी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे.

दरम्यान भरत गोगवले यांना एकनाथ शिंदे यांनी  पक्षाचं प्रतोद केलं, हा निर्णय राज्याबाहेर झाला आहे. सर्व बंडखोर आमदार सुरत, गोवाहाटीला असताना हा निर्णय झाला होता. जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा हे सर्व आमदार राज्यबाहेर होते. 2019 च्या मंत्रिमंडळात शिंदे कॅबिनेट मंत्री होते, असा युक्तिवादही यावेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे. या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, त्या लोकशाहीवर आघात आहेत, या गोष्टी दहाव्या सूचीअनुसार घडल्या नाहीत, असाही युक्तिवाद यावेळी कपिल सिबंबल यांनी केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us