AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाडव्याला गोविंद बागेत का गेले नाहीत? अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं..

यंदा बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये साजरा केला.

पाडव्याला गोविंद बागेत का गेले नाहीत? अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं..
अजित पवार आणि शरद पवार
| Updated on: Nov 02, 2024 | 3:12 PM
Share

यंदा बारामतीमध्ये पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. तर अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. यापूर्वी दिवाळी पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत होतं. मात्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजही पवार कुटुंब एकत्र येणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र यावेळी अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये तर शरद पवार यांनी गोविंद बागेत पाडवा साजरा केला. यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची भेट घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं.आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

आज काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते. त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज अनेक लाडक्या बहिणी भेटण्यासाठी आल्या. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी भेट घेतली. माझे जे जुने पत्रकार मित्र आहे, त्यांना आठवत असेल पूर्वी काटेवाडीमध्येच पाडवा साजरा व्होत होता. पाडव्याच्या दिवशी काटेवाडीमध्ये कार्यकर्ते साहेबांना भेटण्यासाठी येत होते. त्यानंतर पुढे गोविंद बागेची जागा घेतली. बारामतीमधील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सोप आणि सोईचं पडतं म्हणून त्यानंतर पाडवा हा गोविंद बागेतच साजरा व्हायला लागला. आजही भेटणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी खूप होती. लोकांनाही घरी जायची घाई असते, सण साजरा करायचा असतो. त्यामुळे गर्दी विभागली जावी, कार्यकर्त्यांना लवकर घरी जाता यावं म्हणून मी गोविंद बागेत गेलो नाही. काटेवाडीतच पाडवा साजरा केला. ज्या कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं ते त्यांना भेटले. ज्यांना मला भेटायचं होतं ते मला भेटले त्यामुळे गर्दी विभागली गेली अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन ठिकाणी पाडवा साजरा झाला.यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या पूर्वी संपूर्ण कुटुंब गोविंद बागेत पाडवा साजरा करायचं मात्र आता तो दोन ठिकाणी करण्यात आला, यामुळे आपण अस्वस्थ आहोत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की अजित पवार यांना कदाचित वेळ मिळाला नसेल म्हणून ते भेटायला आले नसतील.

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट