Sanjay Raut News: लेखक-साहित्यिकांना अधूनमधून तुरुंगात पाठवलं पाहिजे, संजय राऊतांच्या विधानानं लक्ष वेधलं; नेमकं काय म्हणाले?
Bodh Kirtan Book Launch Event News: संजय राऊत अध्यात्मिक होऊ शकत नाहीत का? बोध-कीर्तन पुस्तकाच्या नावामागची गोष्ट स्वतः संजय राऊतांनीच सांगितली आहे.

संजय राऊत यांच्या बोध कीर्तन पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अंबरीश मिश्र हे उपस्थित होते. हा प्रकाशन सोहळा दादर शिवसेना भवनसमोरील ब्राह्मण सहाय्यक संघ येथे पार पडला. यावेळी संजय राऊतांनी जोरदार भाषण केले आहे. यात त्यांनी अनेक किस्से सांगितले. तसेच त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांच्या पुस्तकात मोदींचे भाषण आणि माल्ल्याचा उल्लेख का केला, याबाबतही मोठा खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पुस्तक प्रकाशनाचा सोहळा व्हायला पाहिजे म्हणून प्रत्येक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा करत आहे. बोध कीर्तन हे नाव ठरलं तेव्हा म्हटलं की हे अध्यात्मिक वाटत आहे. मग मी म्हटल संजय राऊत हे अध्यात्मिक करू शकत नाहीत का? संजय राऊत सकाळी कीर्तनचं करतात की. मी सतत वाचतो, विचार करतो, त्याच्या नोंदी करतो. मला तुरुंगात १०५ दिवस मिळाले. काही कामच नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, अधूनमधून लेखक, साहित्यिकांना तुरुंगात पाठवलं पाहिजे. उत्तम साहित्य निर्माण होईल. क्रांतीची ठिणगीच तिथेच पडली. मीडियाने पुस्तकातून काय घेतलं तर विजय मल्ल्याची गोष्ट. मी अनेक भाषणांमध्ये सांगितलं मी तुरुंगात होतो तेव्हा विजय मल्यासाठी बाजूला चांगला रूम केला होता. सुंदर कोठडी होती. असं वाटलं 2 बीएचके आहे. आम्हाला सांगायचं होतं. बघा आम्ही कसं मानवी हक्क जपतो. आम्ही तिथे जायचो फिरायचो.
संजय राऊतांनी सांगितलं की, मीडिया दाखवते आहे राऊतांनी मोदींचं आणि फडणवीसांचं कौतुक केलं. मोदी काही माझे शत्रु आहेत का? मोदींनी राम प्रतिष्ठापनेला भाषण केलं. उत्कुष्ट भाषण होतं. टेली प्रॉन्टर नव्हता. अराजकीय भाषण होतं म्हणून मी त्याची नोंद करुन ठेवली. या पुस्तकाची कल्पना माझ्या दोन्ही मुलींची आहे. लोकांना वाटेल राऊत नाजूक पद्धतीने कसं लिहू शकतो. ग्रेससारखे कवी माझे मित्र आहेत. माझ्या केबीनमध्ये येऊन बसायचे
ते पुढे म्हणाले की, लोकांना कळलं पाहिजे की आम्ही काय वाचलं तुम्ही काय वाचताय. माणसाने वाचलं पाहिजे. सकाळी सुंदर कविता वाचली. अगोदर मिळाली असती तर पुस्तकात टाकली असती. सब कुछ है अपने पास देश मे रोटी नही तो क्या हुआ, वादा लपेटलो लंगोट नही तो क्या. ही सध्या आपल्या देशाची परिस्थिती आहे. सर्व काही आहे आपल्याकडे चाणक्य आहे नकली आहेत. भाकरी नसेल तरी लोक सहन करत असतात. राज ठाकरे उद्धव ठाकरे राजकारण म्हणून नाही तर पुस्तक प्रेमी म्हणून आले आहेत. दुसरं पुस्तक लवकरच येईल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.