AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज का मिळालं नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अजूनही अजित पवार यांचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं नाही. यावर आता तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज का मिळालं नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
sunil tatkareImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 8:00 PM
Share

अजित पवार यांचा भीषण विमान अपघात झाला होता, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर शंका उपस्थित करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान अजूनही अपघातापूर्वीचं अजित पवार यांचं शेवटचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं नाहीये, याबाबत आता सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आज पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं की, या प्रकरणात तपास यंत्रणा काय तपास करते? हे काय कोणाला माहिती होण्याचं कारण नाही.  अजित पवार यांच्या अपघाताबद्दल जो प्राथमिक अहवाल आला आहे, त्या अहवालावर आम्ही समाधानी नाहीत. त्यामुळे आता तपास यंत्रणांनी अंतिम अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली  आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसनेही तो पाठिंबा द्यावा अशी आमची भूमिका आहे.  यासाठी गरज पडली तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आम्ही भेट घेऊ असं तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचं जाहीर केल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले की,  सध्या आमचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरती आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे, त्यावर मी आत्ताच बोलणार नाही.  मी केवळ विठ्ठल दर्शनासाठी आलो आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार आहे, असंही यावेळी तटकरे म्हणाले.  दरम्यान आता पत्रकार परिषदेमध्ये सुनील तटकरे नेमकं काय बोलणार?  हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...