मोठी बातमी! मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? आता पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील मैदानात, नेमकं काय घडतंय?

मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर देखील मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? आता पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील मैदानात, नेमकं काय घडतंय?
Manoj Jarange Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 3:25 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांना परवानगीशिवाय मुंबईत आंदोलन करता येणार नाही, असे आदेश मुंबई हाय कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाला परवानगी मिळण्यासाठी अर्ज देखील करण्यात आला होता. परंतु सरकारने परवानगी नाकाराली आहे. मात्र परवानगी नाकारल्यानंतर देखील मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबईतील आंदोलनावर ठाम आहेत. मात्र आता पुन्हा एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मैदानात उतरले आहेत. मोठी बातमी समोर येत आहे.

मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. जरांगे पाटील यांच्या भावनांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं, आम्ही देखील त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. आम्ही मनोज जरांगे पाटलांचा आदर केला आहे. आजही आदर करतो उद्याही करणार आहे. परंतु माझी त्यांना विनंती आहे, की त्यांनी आंदोलनाचा मार्ग पुकारण्यापेक्षा मुंबईला येण्यापेक्षा त्यांनी आता आंदोलन थांबावावं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांसाठी जे काम केलं आहे, त्याबद्दल सरकारच्या मनात आदर आहे. अजूनही काही संधी असेल तर आम्ही त्यावर निश्चितपणे विचार करू, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीनंतर आता मनोज जरांगे पाटील आंदोलन मागे घेणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे?

मनोज जरांगे पाटलांकडून आंदोलनाची घोषणा 

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 16 दिवस आहे. त्यांनी बारा सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून ते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्या या उपोषणाला सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us