AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : पुणे हादरलं आधी मैत्रिणीची हत्या अन् मग तरुणाचं खळबळजनक पाऊल, धक्कादायक घटना

पुण्यामधून पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तरुणाने तरुणीची हत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून, प्रेमसंबंधातून हे हत्याकांड घडलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे.

Pune Crime : पुणे हादरलं आधी मैत्रिणीची हत्या अन् मग तरुणाचं खळबळजनक पाऊल, धक्कादायक घटना
पुण्यात तरुणीची हत्या Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 30, 2025 | 5:15 PM
Share

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, हत्या, मारामारी, गुंडागर्दी, कोयता गँगची दहशत अशा घटना अलिकडच्या काळात वाढल्या असल्याच्या पहायला मिळत आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा पुण्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. तरुणाने आधी तरुणीची हत्या केली आणि नंतर स्वत: देखील आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. दरम्यान या तरुणाने तरुणीची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्प्ष्ट होऊ शकलेलं नाहीये. या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. तरुणाने तरुणीची हत्या करत आपलंही जीवन संपवलं आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरात तरुणाने आपल्याच मैत्रिणीची हत्या केली, त्यानंतर त्याने तळेगाव येथे जाऊन स्वत:ही आत्महत्या केली आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघेही तरुण आणि तरुणी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात कामाला होते. गणेश काळे वय 28 असं या तरुणीची हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे, त्याने देखील नंतर आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, मात्र प्रेम संबंधातून तरुणाने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आरोपी तरुण गणेश काळे हा मुळ बीडचा रहिवासी आहे, तर ही तरुणी पुण्यातीलच रहिवासी होती. ते दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. त्या दोघांमध्ये मैत्री होती. ते गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात नोकरीला होते.  समोर आलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये  काही दिवसांपूर्वी काही कारणांमुळे वाद झाला होता, म्हणून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झालं असावं असा संशय पोलिसांना आहे, या प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली .

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...