AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panchayat Samiti Election : कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समितींसाठी निवडणूक होणार? वाचा यादी

Panchayat Samiti Election Date : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात ही निवडणूक पार पडणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समितींसाठी ही निवडणूक होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Panchayat Samiti Election : कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समितींसाठी निवडणूक होणार? वाचा यादी
Panchayat Samiti ElectionImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 02, 2026 | 5:58 PM
Share

राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 7 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या विभागात ही निवडणूक पार पडणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समितींसाठी ही निवडणूक होणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितीतींसाठी निवडणूक

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा करताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद 50 टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे. त्यात निवडणूक होणार आहे. एकूण 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितीतींसाठी निवडणूक होणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी मतदान पार पडणार आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे. संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, परभणी, धाराशीव व लातूर या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक पार पडणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायती समितींसाठी निवडणूक होणार?

  • रायगड – 15
  • रत्नागिरी – 9
  • सिंधुदुर्ग – 8
  • पुणे – 13
  • सातारा – 11
  • सांगली – 10
  • सोलापूर – 11
  • कोल्हापूर – 12
  • छत्रपती संभाजीनगर – 9
  • परभणी – 9
  • धाराशीव -8
  • लातूर – 10

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यक्रम

  • 16 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाईल
  • अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल.
  • उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी, दुपारी 3 वाजेपर्यंत.
  • निवडणूक चिन्ह आणि अंतिम उमेदवार यादी – 27 जानेवारी दुपारी 3.30 वाजेनंतर जाहीर केली जाईल.
  • मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत असेल.
  • मत मोजणी आणि निकाल – 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून.

मतदारांना 2 मते द्यावी लागणार

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरं मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया महापालिकेसारखीच ऑफलाईन असेल. ज्या जागा राखीव आहेत. त्याठिकाणी जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. निवडून आल्यावर सहा महिन्यात जातप्रमाणपत्र द्यावं लागेल. नाही दिलं तर त्याची निवड रद्द होईल.

Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात