AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईवडिलांसमोरच अघोरी प्रकार, मग तेव्हाच आवाज का उठवला नाही? विनायक राऊतांचा गिरीजा राऊतांवर उलट सवाल

vinayak raut news : विनायक राऊत यांनी सूनेचे आरोप फेटाळून लावले आहेत. तिच्या आईवडिलांसोबत घडत असताना, तेव्हाच आवाज का उचलला नाही, असा सवाल राऊत यांनी केला.

आईवडिलांसमोरच अघोरी प्रकार, मग तेव्हाच आवाज का उठवला नाही? विनायक राऊतांचा गिरीजा राऊतांवर उलट सवाल
| Updated on: Jul 12, 2026 | 12:02 PM
Share

माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेने कुटुंबावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक छळाचा आरोप करत गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्ये राऊत यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला. गिरीजा यांनी पोलिसांत दाखल केलेल्या गुन्ह्यांत जादूटोणा, अघोरी प्रकार केल्याचाही आरोप आहे.  परंतु अघोरी प्रकार केल्याच्या आरोप विनायक राऊत यांनी फेटाळून लावला आहे. गिरीजा राऊत यांच्या आईवडिलांसमोरच अघोरी प्रकार झाले, मग तेव्हाच आवाज का उठवला नाही, असा उलट सवाल विनायक राऊत यांनी सुनेला केला.

ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. सूनेच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, ‘माझ्या कुटुंबीयावरील आरोप खोटे आहेत. गितेशसोबत लग्न झाल्यापासून त्याची पत्नी 3 वर्षांपासून सोबत राहत नाही. 2018 ते 2022 पर्यंत अघोरी कृत्य केलं जात होतं, असं त्यांनी म्हटलं. आई-वडिलांना बाबा-बुवाकडे घेऊन जाताना यायचे, असे ती म्हणतेय. आईबाबासोबत होते, असे प्रकार होते. तर त्यावेळी तक्रार का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.

‘गिरीजा राऊत यांनी 2026 मध्ये तक्रार करतात. म्हणजे यामागे काहीतरी काळंबेरं आहे. या प्रकारावेळी आईवडील सोबत असायचे, असं गिरीजा म्हणतेय.. आईवडिलांच्या संरक्षणात असताना अघोरी प्रकारावर तक्रार का केली नाही. त्यांनी घटस्फोटाची याचिका गेल्या महिन्यात केली आहे. आता तडजोड करावी, यासाठी दोन्ही वकिलांची बैठक झाली आहे. थ्री बीएचके फ्लॅट, टेरेस फ्लॅट, पाच कोटी मागितले. इलेक्ट्रिक कार मागितली. त्यानंतर पुन्हा घटस्फोटाची नोटीस धाडली. यात कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख आहे. दर महिन्याला 5 लाख रुपये, कायमस्वरुपी दहा कोटी रुपये देण्याची मागणी गिरीजाने केलीये, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

‘गिराजाने भावनात्मक त्रासापोटी नुकसानभरपाई दोन कोटी मागितली आहे. दहा कोटी अधिक दहा कोटी एकूण १२ कोटी मागितले, असे विनायक राऊत म्हणाले. विनायक राऊत यांच्या कुटुंबावर झालेल्या आरोपाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गिरीजा राऊत यांच्या गंभीर आरोपानंतर ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक