AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनिमूनला गेलो शारीरिक संबंधास… विनायक राऊत यांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, इंटरनॅशनल जाऊनच

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विनायक राऊत यांच्या सूनेने गंभीर आरोप केले. या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

हनिमूनला गेलो शारीरिक संबंधास... विनायक राऊत यांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, इंटरनॅशनल जाऊनच
Vinayak Raut Daughter in law Girija Raut
| Updated on: Jul 12, 2026 | 10:00 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत मोठ्या गोत्यात आले. विनायक राऊत यांच्या सूनेने अत्यंत गंभीर आरोप करत अख्ख्या कुटुंबियांविरोधात पोलिस तक्रार दिली. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पती आणि मुंबई महापालिकेतील नगरसेवक गितेश राऊत, सासरे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह एकून 7 जणांवर गुन्हा दाखल केला. काैटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच हादरवणारे आरोपही तक्रारीत करण्यात आलीत. जादूटोणा करत असल्याचेही तिने तक्रारत म्हटले. तिचे केस कापले, गोमूत्र पाजले, हेच नाही तर पती देखील मानसिक त्रास देत असल्याचे तिने म्हटले.

गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले की, लग्न झाल्यानंतर आम्ही ऊटी येथे हनीमूनला गेलो. ऊटीत आम्ही 6 दिवस होतो. पण गितेशने माझ्यासोबत शीरीरिक संबंध ठेवले नाही. तो सारखा माझ्यापासून दूर पळत होता. तो माझ्यासोबत नक्की असे का वागत आहे, यावर मी त्याला विचारले असता, तुला काही प्रॉब्लेम आहे का? यावर त्याने मला म्हटले की, मेंटल कनेक्ट होणे खूप जास्त गरजेचे असते.

शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नसतात. हेच नाही तर त्याने हनिमूनचा कंटाळा येतो, असेही म्हटले. तो माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे टाळत. 2018 मध्ये आम्ही फिरायला ऑस्ट्रेलियात गेलो. त्यावेळी आमच्यासोबत गितेशचा मित्र महेक नंदू आणि त्याची पत्नी प्रियंका देखील होते. यादरम्यान गितेश माझ्याजवळही आला नाही, मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असताना त्याने शिवीगाळ करून मला मारहाण केली.

शारीरिक संबंधांवरून त्यावेळी आमच्यात वाद झाले.त्याने मला थेट म्हटले की, तू जर मला हात लावला तर तू विधवा होशील. आमच्या झालेल्या वादानंतर त्याने मला काहीच खायला दिले नाही आणि उपाशी ठेवले. हेच नाही शारीरिक संबंधावर त्याचे स्पष्ट मत होते की, मी विदेशात सेक्स करू शकतो, इथे नाही. इथे जसे पाहिजे तसे वातावरण मिळत नाही. आता विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी