Aircraft Fuel Price: सिलिंडर स्वस्त, हवाई इंधन महाग; विमानाची तिकिटं महागणार?

| Updated on: Jan 02, 2022 | 9:01 PM

वर्ष 2021 मध्ये विमान इंधनांच्या किंमतीत दोन वेळा कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल किंमतीच्या कपातीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आणि डिसेंबरच्या मध्यात कपात करण्यात आली होती. नोव्हेंबरच्या मध्यात एटीएफच्या दराने प्रति किलोलिटर 80,835.04 रुपयांचा टप्पा गाठला होता. विमान इंधन दराचा प्रत्येक महिन्याच्या एक आणि सोळा तारखेला आढावा घेतला जातो.

Aircraft Fuel Price: सिलिंडर स्वस्त, हवाई इंधन महाग; विमानाची तिकिटं महागणार?
Follow us on

नवी दिल्ली : नव्या वर्षात व्यवसायिक वापराच्या सिलिंडरच्या दर कपातीची भेट सरकारने दिली. मात्र, हवाई इंधनाच्या दरात वाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत विमान इंधन (एटीएफ) दरात 2.5 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. कोविड प्रकोपामुळे विमानाची चाकं स्थिर होती. निर्बंध शिथिलतेनंतर हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांना दरवाढीमुळे अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. एटीएफच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने विमान कंपन्या भाड्यांची फेररचना करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिलिंडर स्वस्त, एटीएफ महाग!

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किंमतीत प्रति सिलिंडर 102. 5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील कपातीनंतर पहिल्यांदाच दर कमी करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे एटीएफ दरांत फेररचना करण्यात आल्याचे वृत्त आहे. नव्या दर संरचनेनुसार राजधानी दिल्लीत एटीएफचे दर प्रति किलोलिटर 2039.63 रुपयांच्या वाढीसह 76,062.04 वर पोहोचले आहेत.

महिन्यातून दोनदा आढावा

वर्ष 2021 मध्ये विमान इंधनांच्या किंमतीत दोन वेळा कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल किंमतीच्या कपातीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आणि डिसेंबरच्या मध्यात कपात करण्यात आली होती. नोव्हेंबरच्या मध्यात एटीएफच्या दराने प्रति किलोलिटर 80,835.04 रुपयांचा टप्पा गाठला होता. विमान इंधन दराचा प्रत्येक महिन्याची एक आणि सोळा तारखेला आढावा घेतला जातो.

तिकीटं महागणार?

एटीएफची (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) वाढीचे सत्र सुरू राहिल्यास विमान कंपन्या तिकिटांच्या किंमती वाढवू शकतात. कोविड निर्बंधामुळे हवाई प्रवासावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते. मात्र, लसीकरणाचा वाढता वेग आणि निर्बंध शिथिलतेमुळे हवाई सीमा खुल्या झाल्या आहेत. सध्या हवाई प्रवासावर ओमिक्रॉनचं मळभ दाटलं आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील विमानतळावर लॉकडाउन व प्रवासावरील अन्य निर्बंधांमुळे विमानाने प्रवास करणार्‍यांच्या संख्येत मोठी घट नोंदविली गेली आहे.

विमानाचं इंधन, पांढर रॉकेल!

विमानाच्या इंधनाला ‘एटीएफ’ (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) संबोधले जाते. क्रूड तेलापासून एटीएफची निर्मिती केली जाते. विमानाला उड्डाणासाठी टर्बाईन पासून ऊर्जा मिळते. टर्बाईन फिरण्यासाठी इंधन म्हणून एटीएफचा वापर केला जातो. कमी खर्चिक आणि कमी ज्वलनशील इंधनाला नेहमीच प्राधान्य दिले जाते. रेशनिंग वर मिळणारे रॉकेल आणि विमानाच्या इंधनामध्ये जास्त फरक नसतो. विमानाच्या इंधनाला शुद्ध केरोसिन किंवा ‘पांढरे रॉकेल’ देखील संबोधले जाते.