टीव्ही 9 इम्पॅक्ट : मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमधून 2 कोटीच्या कडधान्यांचा साठा जप्त

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलेला 2 कोटी रुपयांच्या कडधान्याचा साठा जप्त करण्यात आला आहे (Action against Black Market in APMC).

टीव्ही 9 इम्पॅक्ट : मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमधून 2 कोटीच्या कडधान्यांचा साठा जप्त
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 12:37 AM

नवी मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीचा फायदा घेत मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलेला 2 कोटी रुपयांच्या कडधान्याचा साठा जप्त करण्यात आला आहे (Action against Black Market in APMC). या ठिकाणी एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांची फसवणूक करण्याचा नवा उद्योग काही व्यापाऱ्यांनी सुरु केला होता. धान्य मार्केटमध्ये काही व्यापारी कोरोनाचा फायदा घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात धान्य, डाळी मागवत होते आणि भाव वाढवून विक्री करत होते. यावर टीव्ही 9 मराठीने दिलेल्या बातमीनंतर अखेर कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊन पूर्वी मुंबई एपीएमसी दाना मार्केटमध्ये 70 रुपये दराने विकल्या जाणारी तूरडाळ, चना डाळ आता 90 ते 105 रुपये दराने विकली जात आहे. 90 रुपये दराने विकली जाणारी मुगडाळ 125 रुपये दराने विकली जात होती. व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या या लूटमारीचा टीव्ही 9 मराठीने पर्दाफाश केल्यानंतर स्वतः छगन भूजबळ यांनी याची दखल घेतली. तसेच वाशी एपीएमसी धान्य मार्केटमधील राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीवर कारवाई केली. या वस्तूंची चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे.

या कारवाईवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “राज्यात जीवनावश्यक वस्तूंसह सॅनीटायझर मास्कची साठेबाजी करणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सर्वत्र अशा कारवाया सुरू असून साठेबाजी करणारे आणि चढ्या किंमतीने विकणाऱ्या व्यवसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येत असून यामध्ये त्यांना सात वर्षाची शिक्षा सुद्धा होऊ शकते.”

राज्याचे वैधमापन शास्त्र व दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत मुंबई एपीएमसी धान्य मार्केट येथे मोठा साठा जप्त केला. व्यापाऱ्यावर टाकलेल्या छाप्यात 2 कोटी रुपयांच्या कडधान्यांचा साठा जप्त सापडला आहे. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. राज्यात कुठे असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये 7 वर्षांच्या कठोर शिक्षेची तरतूद आहे.

एपीएमसी मार्केट मध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये बाजार व गोदामांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ताज अॅग्रो कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड टी टी सी इंडिया एरिया पावणे नवी मुंबई व वसवाल राधेशाम भंडारी टी टी सी इंडिया एरिया पावने नवी मुंबई या आयातदारांनी आयात केलेल्या वस्तूंवर नियमानुसार तपशील नमूद केलेले नसल्याने वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 च्या कलम 17-1/36-1 व त्याअंतर्गत वैधमापन शास्त्र आवेष्टित नियम 2011 मधील नियम 6-1,6-2 अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई कोकण विभागाचे उपनियंत्रक वैधमापन शास्त्र डॉ. खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र सहायक नियंत्रक सी.सा. कदम, निरीक्षक सु.रो कुटे, रा. गु सपकाळ यांनी केली आहे. पूर्ण कारवाईमध्ये 20 ते 25 अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

धान्य मार्केटमध्ये साधारणपणे 200 ते 250 गाड्यांची आवक होते आणि जावकही तितकीच असते. मागील 15 दिवसांपासून बाजारात विविध रायातून कमीत कमी 5 हजार ट्रक धान्य, डाळी बाजारात दाखल झाले. आतापर्यंत 3 लाख मेट्रिक टन धान्य व डाळी मुंबई व उपनगरात गेले आहे. सध्या बाजार आवारात 2 ते अडीच लाख टन डाळी व धान्य आहे. मात्र, मुंबईमध्ये नागरिकांना धान्य व डाळी मिळत नसल्याचं चित्र होतं. यामागील कारण आज अन्न पुरवठा विभागाने मारलेले छापामध्ये स्पष्ट झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्भे एमआयडीसी, पावणेव म्हापेमध्ये कोल्ड स्टोरेज आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे बाजार समितीचे दक्षता पथक असताना त्यांना या गैरव्यवहाराची कुठल्याही प्रकारची माहिती नाही. त्यामुळे या सर्व प्रकारात बाजार समितीच्या दक्षता पथकाची देखील सहमती असून त्यांच्या आशिर्वादानेच हा कारभार चालत असल्याचा आरोप होत आहेत.

संबंधित बातम्या :

केंद्र सरकारकडून मिळणारे धान्य महाग, त्यात सवलत मिळावी : छगन भुजबळ

आधी जितेंद्र आव्हाड, आता त्यांच्यासोबतचे 13 जण होम क्वारंटाईन

पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष

MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल

Action against Black Market in APMC

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.