जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Javed Akhtar Shabana Azmi accident) हे अपघातात जखमी झाले आहेत.

Javed Akhtar Shabana Azmi accident, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Javed Akhtar Shabana Azmi accident) हे अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे.  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात (Javed Akhtar Shabana Azmi accident)  झाला. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना झाली.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टाटा सफारी आणि ट्रक यांची धडक झाली. खालापूर हद्दीत हा अपघात झाला.  या अपघाताची तीव्रता गाडीच्या फोटोवरुन येऊ शकते. अपघातात शबाना आझमी यांना दुखापत होऊन, त्यांच्या शरिरावरचं रक्त फोटोंमधून दिसत आहे.

दरम्यान, जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  जावेद अख्तर यांना सुदैवाने फारशी दुखापत झालेली नाही. ते सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे.

Javed Akhtar Shabana Azmi accident, जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

जावेद अख्तर यांनी काल (17 जानेवारी) त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी आयोजित करण्याता आली होती. या पार्टीला शाहरूख खान, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, ऋतिक रोशन, रेखा यासारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीला रेट्रो थीम ठेवण्यात आली होती. या पार्टीला जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी लाल आणि पांढऱ्या रंगाचे पोलका डॉट असलेले कपडे घातले होते.

शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला. त्यांनी अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. जुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले. जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *