VIDEO: लग्नाला न आलेले मनसैनिक 'कृष्णकुंज'वर, अमित-मितालीला शुभेच्छा!

VIDEO: लग्नाला न आलेले मनसैनिक 'कृष्णकुंज'वर, अमित-मितालीला शुभेच्छा!

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांची नववधू मिताली यांना शुभेच्छा देण्यासाठी आज मनसैनिकांनी गर्दी केली. राज ठाकरेंचं निवासस्थान कृष्णकुंज इथं मनसैनिकांनी नववधूवरास शुभेच्छा दिल्या.

अमित आणि मिताली यांचा 27 जानेवारीला विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आज हा कार्यक्रम ठेवण्यात आला. आज मनसैनिकांनी कृष्णकुंजवर येऊन नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण 27 जानेवारीला विवाहबद्ध झाले. यांचा विवाहसोहळा लोअर परेल येथील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले.

मुंबई : ‘राज’पुत्र अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाची इनसाईड स्टोरी

VIDEO

संबंधित बातम्या

 अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती 

अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो  

मुंबई : ‘राज’पुत्र अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाची इनसाईड स्टोरी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *