अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यांचा विवाहसोहळा लोअर परेल येथील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. अमित …

amit thackeray, अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली बोरुडे हे दोघेजण विवाहबद्ध झाले. यांचा विवाहसोहळा लोअर परेल येथील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीयांसह कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला उपस्थित राहून, नव्या जोडप्याला शुभाशीर्वाद दिले. अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो

amit thackeray, अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती

या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अमितच्या लग्नाला हजर होते. त्यामुळे लग्नसोहळ्यात ठाकरे कुटुंबीयांचे राजकारणापलिकडचे सहृदयी नातेही पाहायला मिळाले. किंबहुना, उद्धव ठाकरेंची उपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय होता.

कुणा-कुणाची उपस्थिती?

 • राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
 • उद्योगपती रतन टाटा
 • सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर
 • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
 • अभिनेते आमीर खान
 • अभिनेता रितेश देशमुख
 • आमदार अमित देशमुख
 • अभिनेत्री भारती आचरेकर
 • गायिका आशा भोसले
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस
 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
 • माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
 • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार
 • खासदार सुप्रिया सुळे
 • ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
 • अभिनेते अतुल परचुरे
 • आमदार आशिष शेलार
 • दिग्दर्शक साजिद खान
 • अभिनेते सुनील बर्वे

कोण आहे मिताली बोरुडे?

मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. तिने फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मिताली प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. तसेच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरुडे या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींनी मिळून ‘द रॉक’ हा कपड्यांचा ब्रँड त्यांनी लाँच केला आहे.

amit thackeray, अमित-मिताली विवाहबद्ध, दिग्गजांची उपस्थिती

अमित आणि मितालीची लव्ह स्टोरी

अमित आणि मितालीची दहा वर्ष जुनी मैत्री आहे. कॉलेजमध्ये असतानाच अमित आणि मिताली एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होती. कॉलेजमध्ये असताना या दोघांची ओळख झाली आणि काही वर्षांनी या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अमतिने मितालीला प्रपोज केला आणि मितालीनेही त्याला होकार दिला. मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्यामुळे कृष्णकुंजवर मितालीचे सारखं येणं जाणं सुरु होतं. मात्र काही दिवसानंतर या दोघांनी आपल्या नात्याबद्दल घरात सांगितले आणि दोघांच्या घरच्यांनीही याला होकार दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *