VIDEO : पती दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये नवऱ्याची गाडी अडवून बायकोचा हंगामा

मुंबईत ऐन ट्राफिकमध्ये 'पती, पत्नी और वो' चा राडा पाहायला (Mumbai Women Caught Husband with his girlfriend Social Media Viral Video) मिळाला.

VIDEO : पती दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये  नवऱ्याची गाडी अडवून बायकोचा हंगामा

मुंबई : मुंबईत ऐन ट्राफिकमध्ये ‘पती, पत्नी और वो’ चा राडा पाहायला मिळाला. स्वत:च्या पतीला परस्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भर रस्त्याच हंगामा केला. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mumbai Peddar road Women Caught Husband with his girlfriend Video Viral On Social Media)

मिळालेल्या माहितीनुसार, हाजी अलीपासून काही मीटर अंतरावरील पेडर रोडजवळील पेट्रोल पंप परिसरात हा सर्व प्रकार घडला. या व्हिडीओत ती महिला, तिचा पती आणि त्याची प्रेयसी दिसत आहे. पतीला परस्त्रीसोबत पाहिल्यानंतर पत्नीने भर रस्त्यातच मारहाण केली. इतकचं नव्हे तर रस्त्यातच गाडी अडवत ती गाडीच्या बोनेटवर चढत तिने हंगामा केला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान हा सर्व प्रकार आज घडल्याचे बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या सर्व प्रकारानंतर  गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्या महिलेची विचारपूसही केली. मात्र तिने पतीविरोधात काहीही तक्रार केलेली नाही.

पण हा मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यावर हा सगळ्या हंगामा झाल्यानंतर त्या दोन्ही गाड्यांवर ट्राफिक पोलिसांनी कारवाई केली आहे. यातील पांढऱ्या रंगाच्या गाडीवर शनिवारी कारवाई करण्यात आली आहे.

मोटर वाहतूक अधिनियम 122 म्हणजे रस्त्यावर अडथळा निर्माण करुन ट्राफिक जॅम करण्याबद्दल ई-चालान करण्यात आलं आहे. तसेच याबाबतची पुढील कारवाई ही स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती डीसीपी वाहतूक शहर पोलिसांनी दिली आहे.(Mumbai Peddar road Women Caught Husband with his girlfriend Video Viral On Social Media)

संबंधित बातम्या : 

आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग अश्लील फोटो, पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत जाळं, बारामतीच्या तरुणाला बेड्या

वाढदिवसाच्या बहाण्याने घरी नेले, कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध, मुंबईत महिलेवर गँगरेप

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *