कोरोनावर मात, पण खासगी रुग्णालयाचा डायलिसिसला नकार, 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

कोरोनावर मात केलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा डायलिसिस न केल्यामुळे मृत्यू झाला आहे (New Mumbai Corona Cases).

कोरोनावर मात, पण खासगी रुग्णालयाचा डायलिसिसला नकार, 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 21, 2020 | 12:10 AM

नवी मुंबई : कोरोनावर मात केलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा डायलिसिस न केल्यामुळे मृत्यू झाला आहे (New Mumbai Corona Cases). ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या सानपाडा सेक्टर 5 परिसरात घडली. मृत मुलाला कोरोनावर मात केल्यानंतर 13 मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. या मुलाची 15 मे रोजी डायलिसिस होणे गरजेचे होते. मात्र, शहरातील इतर रुग्णालयांनी सहकार्य न केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे (New Mumbai Corona Cases).

वाशी येथील मनपा रुग्णालयाचं रुपांतर कोविड 19 रुग्णालयात करण्यात आलं आहे. त्यामुळे तेथील डायलिसिस सेंटर बंद आहे. खाजगी रुग्णालयांत डायलिसिसची विचारणा केली असता दोन टेस्ट निगेटिव्ह आल्याचे अहवाल खाजगी रुग्णालयाकडून मागवण्यात आले. जोपर्यंत दुसऱ्या टेस्टचा अहवाल निगटिव्ह येत नाही तोपर्यंत डायलिसिस करण्यास खाजगी रुग्णालयांनी नकार दिला.

शेवटी बेलापूर येथील रुग्णालयाने डायलिसिस करण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यापूर्वीच मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील इतर रुग्णालयांनी सहकार्य न केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे. एकूणच काय तर या मुलाने कोरोनाला तर हरवले. मात्र, तरीही रुग्णालयांच्या असहकार्यामुळे मुलाची झुंज अपयशी ठरली.

दरम्यान, राज्यात कोरोनाचे दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांना नियमित डायलिसिसची आवश्यकता आहे त्यांच्या उपचारात अडथडा येत असल्याची माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी डायलिसिसिसाठी कोरोनाची चाचणी करणं बंधनकारक केलं आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.