AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; कुठे घडला हा प्रकार, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

CM Eknath Shinde : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. दरम्यान मुंबईतून मोठी अपडेट समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कार घुसविण्याचा आणि त्यांच्या ताफ्याचा पाठलाग करण्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी प्रकरणात एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कार घुसवण्याचा प्रयत्न; कुठे घडला हा प्रकार, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न
| Updated on: May 08, 2024 | 9:12 AM
Share

Lok Sabha Election 2024 ची सगळीकडे धामधूम सुरु आहे. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. राज्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह मराठवाड्यात मतदान झाले. दरम्यान मुंबईत एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका तरुणाने कार घुसविण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हा प्रकार का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

नेमकं घडलं तरी काय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११:१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा वरळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत लेन क्रमांक ७ मध्ये आला. याच मार्गिकेवरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. पोलिसांनी कार चालकाला त्वरीत लेन ६ मध्ये जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सूसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. कार ताफ्याच्या मागोमाग घुसवत तोदेखील वरळीच्या दिशेने जाऊ लागला.

कारचालकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी वरळी वाहतूक विभागाच्या मदतीने त्याला थांबविले आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक येथे रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामागे कार घेऊन निघालेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे शुभमकुमार जगदीश कुमार असं नाव आहे. हा ३० वर्षांचा तरुण माउंट मेरी परिसर, वांद्रे पश्चिम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कारण तरी काय

पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या तरुणाला ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखले. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या मदतीने त्याला थांबविले. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाने हा प्रकार का केला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. इशारा देऊन हा तरुण न थांबल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा